International breaking Live News Marathi : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर अतंराळातून सुखरुप परतले. दरम्यान अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. सुनीता विल्यम्स यांनी त्यांना अंतराळातून सुखरुप परत आणल्याबद्दल, नासा, स्पेसएक्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचा अनुभव शेअर केला. त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर परत आल्याचा अनुभव अत्यंत सुखद आहे. तसेच त्यांनी अंतराळातून भारताकडे पाहाताना विलक्षण असे दृश्य अनुभवायला मिळाले असेही म्हटले.
“India is amazing.” More from Suni in this clip: pic.twitter.com/M2ajvyAen9
— NASA (@NASA) March 31, 2025
01 Apr 2025 04:49 PM (IST)
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (1 एप्रिल ) सकाळी 8 वाजता मलेशियाची राजधानी क्वालालंपूरजवळ पेट्रोल पंपावर मोठा स्फोट झाला आहे. गॅस पाइपलाईन फुटल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणत आग लागली. आगीच्या ज्वाला अनेक किलोमीटर अंतरावरुन दिसत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत किमान 100 हून अधिक लोक जखमी झाले आहे. आतापर्यंत 63 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्याचे आणि लोकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. ही घटना क्वालालंपूरच्या बाहेरील सेलांगोर राज्यातील पुचोंग शहरात घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 500 मीटर लांबीच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह बंद केला होता यामुळे मोठा स्फोट झाला. याचा स्फोटाचा फटका 49 घरांना बसला आहे.
A massive fire has erupt from broken gas pipeline in Malaysia.Some sources state that black soot started coming down from the rain. pic.twitter.com/hsnsXbBNQM
— Domenico (@AvatarDomy) April 1, 2025
01 Apr 2025 04:17 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत रशियन तेलावर टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती. यामागचे कारण म्हणजे पुतिन यांनी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर केलेल्या विधानामुळे ट्रम्प यांनी पुतिन यांना इशार दिला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीचा परिणाम भारतीय तेल खरेदीवर होण्याची शक्यता आहे.
01 Apr 2025 03:05 PM (IST)
चीनच्या लष्कराने तैवानभोवती लष्करी कारवाई सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने लष्कर, नौदल, हवाई दल आणि रॉकेट्स फोर्सचे संयुक्त सराव तैवानभोवती सुरु केले आहेत. अमेरिकेला इशारा देत चीनने घोषणा केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आशिया दौऱ्यादरम्यान टिनी आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यावर भाष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PAL) ने म्हटले आहे की, युद्ध सरावादरम्यान चिनी सैन्य तैवानच्या दिशेने जाईल. या सरावात समुद्र आणि आणि भू-मार्गांवरील लक्ष्यांवर हल्ले करणे आणि महत्वाच्या क्षेत्रांची, सागरी मार्गांची नाकेबंदीच्या रणनीतीचा समावेश असेल असे म्हटले आहे. याचा उद्देश संयुक्त ऑपरेशन क्षमतेची चाचणी घेणे आहे. तसेच 'तैवान स्वातंत्र्याचे' समर्थन करणाऱ्या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध हा आमचा कडक संदेश आणि शक्तिशाली इशारा आहे. चीनच्या सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय एकतेचे रक्षण करण्यासाठी हे सराव एक कायदेशीर आणि आवश्यक कृती आहे.
China launches more military drills around Taiwan https://t.co/b5EXf99VOt
— Taiwan News (@TaiwanNewsEN) April 1, 2025
01 Apr 2025 02:49 PM (IST)
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने (DoE)ने एका अमेरिकन कंपनीला भारतात अणुउर्जा प्रकल्प सुरु करण्यास अतिम मंजुरी दिली आहे. दोन दशकापूर्वी झालेल्या भारत-अमेरिका नागरी कराराला आता मुर्तस्वरुप प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20007 मध्ये भारत-अमेरिका नागरी अणु करार करण्यात आला होता. या करारांतर्गत बुधवारी (26 मार्च ) रोजी अंतिम मान्यता दिली. भारताचे तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु जवळपास 18 वर्षांनंतर या कराराला अंतिम मान्यता मिळाली.
01 Apr 2025 02:03 PM (IST)
भारताने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)या भारत सरकारच्या संरक्षण संस्थेने रशियाला संवेदनशील तंत्रज्ञान पाठवल्याचा दावा करणारा न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल फेटाळून लावला आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाला चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. अझिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल राजकीय हेत साध्य करम्यासाठी चुकीच्या तथ्यांना तोडन-मोडून मूलभूत तपासणी न करता सादर करण्यात आला आहे.
01 Apr 2025 01:08 PM (IST)
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील दोन दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात फूट पडल्याचे माहिती समोर आली आहे. दोन्ही अतेरिकी गटांचे दहशतवादी आमने-सामने आले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. जैश आणि लष्कर या गटांतील वैचारिक आणि धोरणात्मक फरकांमुळे त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले आहे. या दहशतवादी गटांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीमुळे भारतासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन संघटनांमधील शत्रुत्वामुळे एका गटाने दुसऱ्या गटाच्या काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली, त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे स्थान निश्चित करत त्यांच्यावर कारवाई करता आली. जैश-ए-मोहम्मदसाठी पाकिस्तानमधील सुरक्षा वातावरण आणि परिस्थिती बदलल्यामुळे हा गट आता जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक घुसखोरी करत आहे.
01 Apr 2025 12:44 PM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला गाझातील हमास आणि इस्त्रायली संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. इस्त्रायलने गाझात सुरु केलेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या 10 दिवसांत किमान 322 मुलांता मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, यामध्ये 609 जण जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रशंघाच्या बाल अधिकार संस्थेने UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी झालेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गाझातील अलनसार इस्पितळावर इस्त्रायलने बॉम्ब हल्ला केला होता. UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मुले विस्थापित झाली असून तात्पुरत्या छावण्यांमध्ये वास्तव करत होते, तसेच काही उदध्वस्त झालेल्या घरांमध्ये आश्रय घेत होते.
01 Apr 2025 11:50 AM (IST)
नेपाळमध्ये 28 मार्च 2025 रोजी राजोशाही समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या हिसांचारात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, लुटमार आणि तोडफोड करण्यात आली. या मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले.दरम्यान काठमंडूतील कोटेश्वर भागातील भाट-भटेनी सूपमार्केटची मोठ्या प्रमाणावर लुट , तोडफोड झाली. या घटनेने संपूर्ण नेपाळला हादरवून सोडले आहे. हे सूपरमार्केट नेपाळच्या सर्वामोठ्या बाजारपेठांपैकी मानले जाते. या मार्केटमध्ये दररोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र या हिंसक घटनेमुळे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे व्यपारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
01 Apr 2025 11:13 AM (IST)
सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या अणु प्रकल्पावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बॉम्बहल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीला प्रत्युत्तर देताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यानी इराण या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देईल असे म्हटले आहे. खामेनेई यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्त्रायलसोबत नेहमीच वैर राहिले आहे. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याची धमकी याआधीही दिली होती, पण ते होणार नाही. त्यांनी असे केल्यासस त्याना योग्य उत्तर मिळेल. तसेच खामेनेई यांनी इस्त्रायलने केलेल्या गाझावरील हल्ल्याचाही निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दुष्ट इस्त्रायल पॅलेस्टिनी लोकांना पूर्णपण नष्ट करु इच्छितो आहे.
01 Apr 2025 10:56 AM (IST)
म्यानमारमध्ये शुक्रवारी 28 मार्च रोजी 7.7 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या विनाशकारी भूकंपामुळे मृतांची संख्या 2 हजार 56 वर पोहचली आहे. तसेच 3 हजार 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुमारे 270 लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 7.7 रिश्ट स्केल तीव्रतेचा या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरु असन मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने या भयानक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे.