Terror Attack: पोलिओ डोस द्यायला गेले अन् जीवाला मुकले; पाकिस्तानमध्ये Polio बुथवर दहशतवादी हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिओ गटाचे कार्यकर्ते खैबर पख्तूनख्वामध्ये घरो-घरी जाऊन मुलांना पोलिओचा डोस पाजत होते. यावेळी प्रत्येक पोलिओ पथकासोबत एक सुरक्षा अधिकारी आणि पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आला होता. याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. सध्या या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु स्थानिक दहशतवाद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानमध्ये पोलिओ निर्मूलन अभियान गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कट्टरता आणि अफवांमुळे वादाचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे, पोलिओला विषाणू डोस म्हणून संबोधले जात आहे. तहरीक-ए-तालिबान (TTP) सारख्या अनेक दहशतवादी संघटनेने या लसीला तीव्र विरोध केला आहे. त्यांच्या मते पाकिस्तान नागरिकांना मारण्याचे पाश्चात्य षड्यंत्र आहे. यामुळे मुस्लिम मुलांची नसबंदी होत असल्याच्या अफवा पाकिस्तानमध्ये पसरत आहेत. यामुळे २०१२ मध्ये ही मोहिम सुरु झाल्यापासून २०० हून अधिक पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.
याच वेळी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात प्रचंड अस्थिरता पसरली आहे. बलुचिस्तानच्या स्वतंत्रतेसाठी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने सरकार आणि लष्कराविरोधात बंड पुकारला आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, स्फोट केला जात आहे. यामध्ये अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिला फियादिनचाही समावेश आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्थिरता पसरलेली आहे.
मुनीर लष्कर हादरले! बलूचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात दोन महिलांचा हात; पाक सैन्याची पळता भुई






