चीन कधीपर्यंत बनवणार '१०००' Nuclear weapons? अमेरिकन गुप्तचर अहवालात सत्य आले समोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
China nuclear arsenal 2030 : चीनच्या वाढत्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. त्यांच्या अलीकडील गुप्तचर मूल्यांकन अहवालानुसार, चीनकडे सध्या 600 हून अधिक ऑपरेशनल अण्वस्त्रे असून, 2030 पर्यंत ही संख्या 1000 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पूर्व आशियातील सामरिक स्थैर्यावर तसेच भारताच्या सुरक्षाव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, चीन सध्या अत्यंत वेगाने अण्वस्त्रांचा साठा वाढवतो आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आपल्या अण्वस्त्र दलाचा विस्तार करण्यावर भर देत असून, त्यामध्ये उच्च-सज्जता पातळीवर जलद प्रतिसाद देऊ शकणाऱ्या शस्त्रांची तैनाती केली जात आहे. अंदाजानुसार, 2035 पर्यंत चीन आपली आण्विक ताकद अधिक व्यापक स्वरूपात वाढवत राहणार आहे. याचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे, तर आक्रमक धोरणाद्वारे तैवानवर वर्चस्व प्रस्थापित करणे, आणि पूर्व आशियामध्ये अमेरिकी प्रभाव कमी करणे हे आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन स्वतःला अमेरिकेशी समकक्ष सामरिक ताकद म्हणून उभारण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CBIकडून इंटरपोलच्या नव्या ‘Silver Notice’चा पहिला वापर; व्हिसा फसवणूक व दुबईतील मालमत्ता प्रकरण उजेडात
या पार्श्वभूमीवर भारतातील सुरक्षाव्यवस्था आणि अण्वस्त्र धोरणातही बदल दिसून येत आहेत.
SIPRI (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) च्या 2024 च्या अहवालानुसार,
1. भारताकडे 172 अण्वस्त्रे
2. तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत.
ही पहिलीच वेळ आहे की भारताच्या अण्वस्त्रांची संख्या पाकिस्तानपेक्षा अधिक आहे. दोन्ही देशांनी 2023 मध्ये नवीन अण्वस्त्र वितरण प्रणाली विकसित करण्यावर भर दिला असून, भारताने लांब पल्ल्याची आणि चीनला लक्ष्य करण्यास सक्षम क्षेपणास्त्रे विकसित करणे सुरू ठेवले आहे. अहवालात नमूद केले आहे की भारताचा मुख्य अण्वस्त्र धोरणात्मक फोकस पाकिस्तानवर केंद्रित असला, तरी सध्याच्या वाढत्या चीन धोका लक्षात घेऊन भारतीय अण्वस्त्र धोरणात स्पष्टपणे पुनर्रचना सुरू झाली आहे.
जगातील अण्वस्त्रांच्या बाबतीत अद्यापही रशिया आणि अमेरिका आघाडीवर आहेत.
रशिया – 4380 अण्वस्त्रे,
अमेरिका – 3708 अण्वस्त्रे (SIPRI, जून 2024).
एकूणच 90 टक्क्यांहून अधिक अण्वस्त्र साठा या दोन राष्ट्रांकडे आहे. मात्र चीनच्या सध्याच्या आकांक्षा आणि त्याची अंमलबजावणी पाहता, हा आकडा भविष्यात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🇨🇳”CHINA’S NUCLEAR ARSENAL”
The U.S. Department of Defense estimates that China has over 600 operational nuclear warheads, up from 500 last year, and still estimates that China will have over 1,000 nuclear warheads by 2030.
In addition to the expansion of its nuclear arsenal,… pic.twitter.com/7o6kl6Y7uR
— WORLD AT WAR (@World_At_War_6) April 23, 2025
credit : social media
PLA चे अण्वस्त्र धोरण केवळ संरक्षणापुरते मर्यादित न राहता, आक्रमक, धोरणात्मक दबाव निर्माण करणाऱ्या स्वरूपाचे आहे, असे या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे धोरण चीनच्या वाढत्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रणाली, तसेच त्याच्या अणुऊर्जा धोरणाशी संबंधित आहे. हे सर्व परिप्रेक्ष्य पाहता, जगात पुन्हा एकदा शीतयुद्धासारखी शस्त्रस्पर्धा उभी राहत असल्याचे संकेत मिळत आहेत, आणि त्यात भारतालाही आपले सामरिक धोरण नव्याने आखावे लागणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतविरोधात विनाशकारी कटकारस्थान! चीनच्या मदतीने पाकिस्तान बनवत आहे WMD शस्त्रे; अमेरिकेचा गंभीर इशारा
चीनच्या अण्वस्त्र वाढीमुळे जागतिक सामरिक समतोल बिघडू शकतो. भारतासारख्या राष्ट्रांसाठी ही बाब अधिक चिंताजनक आहे कारण दोन्ही शेजारी पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रशक्ती असलेले आहेत. यामुळे भारताला केवळ आपल्या तांत्रिक क्षमतेच नव्हे तर सामरिक धोरणातही मोठे बदल करावे लागतील. अमेरिकन गुप्तचर अहवालातून चीनच्या या आक्रमक रणनीतीचा उलगडा होत असून, भारत, अमेरिका व जगभरातील सामरिक धोरणकर्त्यांना आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.