चीनच्या निशाण्यावर 'चिकन नेक'? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध? (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
नुकतेच चीनच्या राजदूताने तिस्ता प्रकल्प क्षेत्राला भेट दिली आहे. यावेळी या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच राजदूतांनी तीस्ता प्रकल्प जलद करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यामुळे बांगलादेश आणि चीनची मैत्री अधिक मजबूत होईल असे त्यांनी म्हटले. याशिवाय दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. तसेच बांग्लादेश चीन मधील मैत्री आणि विकास सहाकार्यावर सहमदती दर्शवली.
पण या भेटीमुळे भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेकला धोका निर्माण झाला आहे. चिकन नेक ही भारताची सीमा आहे, जी ईशान्येकडील राज्यांवा जोडते. या भागाला सिलगुडी कॉरिडॉरही म्हटले जाते. ही भारताची जीवनरेखा आहे कारण, या मार्गावरुन भारताला अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या देशांशी व्यापार करता येतो. वायव्येला नेपाळ आणि ईशान्येला भूतानचे खोरे आहे. या अरुंद मार्गावरुन रस्ते, महत्वाचे रेल्वे मार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, उच्च व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन ग्रिड, फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. पण चीनच्या या भागातील उपस्थितीमुले यावर आणि दैनंदिन जीवन, व्यापार, संरक्षणाला धोका वाढू शकतो.
Chinese Ambassador Meets the National Security Adviser Dhaka, January 18, 2026: The Ambassador of the People’s Republic of China to Bangladesh, Mr. Yao Wen, paid a courtesy call on the National Security Adviser, Dr Khalilur Rahman at the Chief Adviser’s Office on Sunday. The… pic.twitter.com/szOKQWC25v — Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) January 18, 2026
तीस्ता नदी ही सिक्कीमधून उगम पावते आणि पुढे पश्चिम बंगालमधून वाहत बांगलादेशात प्रवेश करते आणि अखरेसी ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या पाणी वाटपावरुन भारत आणि बांगलादेशात अनेक दशकांपासून वाद सुरु आहे. दरम्यान आता बांगलादेश चीनच्या मदतीने तीस्ता नदीवर मास्टर प्लॅन अमलांत आणत आहेत. पण यामुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला धोका निर्माण होत आहे.
या प्लॅनअंतर्गत बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधून आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे. बांगलादेशला भारतावरील अवलंबित्व कमी करायचे आहे, यामुळे ही योजना आखण्यात आली आहे. पण तीस्तावर चीनची उपस्थितीही भारतासाठी धोरणात्मक आव्हान ठरत आहे.
युनूसची नवी खेळी? चीनसोबत मिळून तिस्तावर आखली मोठी योजना; भारतासाठी धोक्याची घंटा
Ans: चिकन नेक हा सिलगुडी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर भारताच्या मुख्य ईशान्य राज्यांशी जोडणार मार्ग आहे.
Ans: तीस्ता प्रकल्प हा भारत आणि बांगलादेशचा पाणी वाटप प्रकल्प आहे, परंतु यामध्ये चीनच्या सहभागामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Ans: तीस्ता प्रकल्प हा चिकन नेक जवळ असून यामध्ये चीनची उपस्थिती भारताच्या धोरणात्मक सुरक्षितेवर परिणाम करु शकते, यामुळे भारतासाठी ही परिस्थिती धोकादायक मानली जात आहे.
Ans: बांगलादेशच्या तीस्ता मास्टर प्लॅनमुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे, ज्यातून भारतावरील अवलंबित्व कमी होईल.






