Russia-Ukraine War : चिनी सैन्याच्या हालचालीने जागतिक गोंधळ, VIDEO व्हायरल! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कीव : युक्रेन-रशिया युद्धाने आता नवे वळण घेतले असून, चीनही प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाल्याचा धक्कादायक दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी पुरावा म्हणून डोनेत्स्क प्रदेशातून दोन चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, चीनच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मंगळवारी (८ एप्रिल) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठे वक्तव्य करत सांगितले की, रशियन सैन्यासोबत चिनी सैनिकही युक्रेनविरुद्ध लढाई लढत आहेत. युक्रेनियन सैन्याने डोनेत्स्क येथे दोन चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण सहा चिनी सैनिकांची युक्रेनियन सैन्याशी चकमक झाली, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर इतर जखमी किंवा फरार झाले असण्याची शक्यता आहे. रशियन सैन्याच्या विविध तुकड्यांमध्ये आणखी चिनी सैनिक असू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : टॅरिफ शुल्काची वाढ, आर्थिक विकासावर होणार नाही कोणताही मोठा परिणाम; 6.3-6.8 % राहणार जीडीपी वाढ
Our military has captured two Chinese citizens who were fighting as part of the Russian army. This happened on Ukrainian territory—in the Donetsk region. Identification documents, bank cards, and personal data were found in their possession.
We have information suggesting that… pic.twitter.com/ekBr6hCkQL
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) April 8, 2025
credit : social media
युक्रेन सरकारने एका पकडलेल्या चिनी सैनिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तो आपली ओळख सांगताना दिसतो. झेलेन्स्की म्हणाले की, हा पुरावा चीन सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यास महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांनी अधिकाऱ्यांना चीनकडून या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया मिळवण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. पकडलेल्या सैनिकांचा ते चीन सरकारच्या आदेशानुसार लढत होते की स्वतःहून सहभागी झाले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे प्रकरण आधीच्या एका मोठ्या घडामोडीशी जोडले जात आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियानेही रशियाला लष्करी मदत पुरवल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या अंतर्गत कुर्स्क प्रदेशात उत्तर कोरियन सैनिक तैनात करण्यात आले होते. युद्धादरम्यान अनेक उत्तर कोरियन सैनिक मारले गेले होते, ज्यामुळे उत्तर कोरियाच्या सहभागावरही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, चीनच्या बाबतीत परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे. चीनचा थेट सहभाग असल्यास, हा रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा टप्पा ठरू शकतो आणि जागतिक राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.
या घटनेनंतर पाश्चात्य देश आणि अमेरिका कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, हा मुद्दा संयुक्त राष्ट्र (UN) आणि G7 परिषदेत मांडला जाणार आहे. याआधीच अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांनी रशियाला मदत करणाऱ्या कोणत्याही देशाविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. जर चीनचा प्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला, तर अमेरिका आणि युरोपियन युनियन चीनवर गंभीर निर्बंध लादू शकतात.
रशियाला आधीच उत्तर कोरियाकडून हत्यारे आणि सैनिकांची मदत मिळत असल्याची शक्यता होती, आणि आता चीनचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास, युक्रेनसाठी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. रशिया आधीच शक्तिशाली सैन्य आणि आधुनिक हत्यारे वापरत आहे. जर चीननेही प्रत्यक्षपणे सैन्य पाठवायला सुरुवात केली, तर युक्रेनसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tahawwur Rana: 26/11 चा दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणण्याची तयारी, दोन तुरुंगांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था
झेलेन्स्कींच्या या आरोपांनी संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला वेग आला आहे. जर चीन सरकारने अधिकृतपणे हे आरोप फेटाळले नाहीत, तर पाश्चात्य देशांमध्ये चीनविरोधी आघाडी अधिक मजबूत होऊ शकते. आता सर्वांचे लक्ष चीनच्या अधिकृत प्रतिसादावर आणि अमेरिकेच्या संभाव्य कारवाईवर केंद्रित झाले आहे. या नव्या घडामोडींमुळे युक्रेन युद्धाचा पुढील टप्पा अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचा ठरू शकतो.