चाकूने १२ वार, एक डोळा निकामी; सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हादी मातरला २५ वर्षांची शिक्षा
जगप्रसिद्ध भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या हादी मतर याला शुक्रवारी २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. २०२२ मध्ये सलमान रश्दी अमेरिकेत स्टेजवरून भाषण देत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये ज्युरीने हादीला हत्येच्या प्रयत्नाचा दोषी ठरवले होते. रश्दी यांना या हल्ल्यात गंभीर इजा झाली होती. त्यांना एक डोळा गमवावा लागला होता.
बुकर पारितोषिक विजेते लेखक सलमान रश्दी यांनी या हल्ल्यात एका डोळ्याची दृष्टी गमावली. ज्युरी हादीची शिक्षा सुनावत असताना सलमान सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांनी न्यायालयात ‘व्हिक्टिम इम्पॅक्ट स्टेटमेंट’ पाठवले होते. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर १२ वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. एका क्षणाला त्यांना असं वाटलं की आता आपला मृत्यू अटळ आहे.
ATM Card Fraud : एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून एकाची फसवणूक; तब्बल ४८ हजारांना घातला गंडा
सलमान यांच्यावर हल्ला झाला तेव्हा सुमारे १४०० लोक उपस्थित होते. मातरने केवळ सलमान यांनाच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांवरही हल्ला करण्याचा कट रचला होता. मातर यांच्या वकिलांना न्यायालयात युक्तिवाद करताना, मातरवर कोणतेही गुन्हेगारी खटले दाखल नाहीत. म्हणून, त्याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात यावी. मीडिया ट्रायल आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा या खटल्यावर परिणाम झाला, म्हटलं होतं. मात्र कोर्टाने त्याला २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या साथीदारालाली सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.