तैवानमध्ये सकाळी सकाळी जाणवले भूकंपाचे धक्के, ६.३ रिश्टर स्केल तिव्रता, सुदैवाने जीवितहानी नाही!

सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खाली होता.

    चार-पाच दिवसापुर्वी चीनच्या गान्सू प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 होती. या भुंकपामुळे तब्बल १११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. भुंकपानंतर या परिसरात बचाव कार्य सुरू आहे. मात्र आता पुन्हा एका देशाला भुंकपाचे हादरे बसले आहेत.

    तैवानमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के (Taiwan Earthqauke) जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी जाणवली. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खाली होता.