China Pakistan Deal : हिंद महासागरात पाकिस्तानचं राज्य? चीनकडून खरेदी करणार 'हे' घातक शस्त्र, भारताची डोकेदुखी वाढणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या लष्करी ताकदीत वाढ ही भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा एक प्रयत्न आहे. ही बाब भारतासाठी धोक्याची मानली जात आहे. कारण पाकिस्तानकडे सध्या अत्याधुनिक स्टर्लिंग इंजिनवर आधारित सायलंट किलर पाणबुड्या असणार आहेत. यांचा शोध घेणे अत्यंत कठीण असते. यामुळे भविष्यात अरबी आणि हिंद महासागरात भारतासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.