अफगाणिस्तानमध्ये भूंकप (afghanistan earthquake) होऊन आठवडा उलटत नाही तोच आता पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाच हादरा बसला आहे. अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप आला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या जोरदार भूकंपांच्या मालिकेनंतर आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
[read_also content=”‘समृद्धी’वरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://www.navarashtra.com/maharashtra/5-lakh-each-to-the-families-of-those-killed-in-the-accident-on-samruddhi-free-treatment-for-the-injured-chief-minister-eknath-shindes-announcement-nrdm-470319.html”]
अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच असून आता पुन्हा आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
मागील आठवड्यात 8 ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या हेरातमधे भूकंप झाला. यामुळे जेंदा जान जिल्ह्यातील चार गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, ६.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या उत्तर-पश्चिमेस ४० किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर ५.५ रिश्टर स्केलचा हादराही जाणवला. सर्वेक्षणाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेला नकाशा या प्रदेशात सात भूकंप दर्शवण्यात आले आहेत.