ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
टेक कंपनी अस्ट्रोनॉमरच्या एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांनी त्यांचे पती अँड्र्यू कॅबोटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यू हॅम्पशायरमधील न्यायालयात यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रिस्टिन कॅबोट यांचा कंपनीचे सीईओ अँडी बायर्न यांच्यासोबत रोमान्स करताना पकडल्या गेल्या होत्या. यानंतर हे प्रकरण अत्यंत चर्चेत आले होते.
खरं तरं ही जुलै महिन्यातील गोष्ट आहे. १८ जुलै रोजी प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्लेचा ‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर’ बोस्टनमध्ये आयोजित केला होता. यावेळी कॉन्सर्टमध्ये किस कॅम बसवण्यात आला होता. यावेळी किस कॅमने गर्दीतील एका जोडप्यावर लोकांचे लक्ष वेधले.
जोडपे एकमेकाेंना मिठी मारुन कॉन्सर्टचा आनंद घेत होते. किस कॅमवर येताच जोडप्याने तोंड लपवले, यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. क्रिस्टिन कॅबोट या अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांच्यासोबत होत्या. दोघांचीही अवस्था किस कॅमवर आल्यानंतर बिकट झाली होता. यावेळी क्रिस मार्टीने वातावरण हलके करण्यासाठी विनोदही केला होती, अरे या दोघांकडे पाहा, बहुतेक त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत, असे म्हटले. नंतर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
न्यूजर्सीत नगरपरिषदेच्या बैठकीत कर वाढीला अनोखा निषेध; उमेदवाराने केला ‘ब्रेक डान्स’, Video Viral
यानंतर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे जगासमोर आले. अँडी बायर्न आणि क्रिस्टिन कॅबोट दोघांचेही वेगवेगळ्या पार्टनरशी लग्न झाले होते. यामुळे हे प्रकरण कंपनीपर्यंत गेले आणि या दोघांना राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिस्टिन कॅबोटने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यू हॅम्पशायरच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Busted!
This backfired real quick.
CEO and HR having an affair and were outed during Coldplay‘s concert 👀
Andy Byron and Kristin Cabot from Astronomer 😬😬😬
Wife‘s Facebook has already been found and people commenting on it. pic.twitter.com/RWgYDVMuaV
— Mrs. SpaceX ™️ (@anuibi) July 17, 2025
अँडी बायर्न यांच्या पत्नी मेगनही नाराज
याच वेळी अँडी बायर्न यांच्या पत्नी मेगन बायर्न यंनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. मेगन बार्यनने तिच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमधून बार्यन आडनाव काढून टाकले आहे. परंतु या प्रकरणावर मेगन यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
अमेरिकेच्या हवाई राज्यावर घोंगावतय ‘किको’ वादळाचे संकट; आणीबाणीचा इशारा जारी