रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) ३७ व्या दिवशीही सुरू आहे. रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून युक्रेनच्या लष्कराने आता रशियन शहरावर हल्ला केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, रशियाच्या पश्चिमेकडील शहर बेल्गोरोडचे गव्हर्नर म्हणाले की, शुक्रवारी युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टरने त्यांच्या तेल डेपोवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. या युद्धात दोन्ही देशांच्या लष्करासोबतच सर्वसामान्य नागरिकांचीही मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरल ऑफिसनुसार, रशियन हल्ल्यात आतापर्यंत १५३ मुलांचा मृत्यू झाला आहे, तर २४५ हून अधिक मुले जखमी झाली आहेत.
[read_also content=”माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असून ते उत्तम काम करीत आहेत – मुख्यमंत्र्याकडून दिलीप वळसे पाटलांची पाठराखण https://www.navarashtra.com/maharashtra/cm-udhhav-thackeray-says-that-i-have-full-faith-on-my-colleagues-and-they-are-doing-a-great-job-nrps-262836.html”]
चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून रशियन सैन्य माघार घेत आहे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियन सैन्याने २४ फेब्रुवारी रोजी चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला. येथून आता रशियन सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. “सैनिक चेरनोबिलपासून दूर जात आहेत आणि बेलारूसमध्ये प्रवेश करत आहेत,” अधिका-याने सांगितले.
अमेरिका दररोज 1 दशलक्ष बॅरल कच्चे तेल सोडणार आहे युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पुढील सहा महिन्यांसाठी दररोज दहा लाख बॅरल तेल सोडण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की, युक्रेनमधील लष्करी हल्ल्यामुळे, रशियावर अमेरिकेसह अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
युक्रेनमध्ये आतापर्यंत झालेलं नुकसान
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने आतापर्यंत १३७० क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि १५ युक्रेन विमानतळ नष्ट केले आहेत. रशियाच्या सततच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत १४८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या निप्रोपेत्रोव्स्क भागात असलेल्या लष्करी तळावर रशियन सैन्याने हल्ला केला आहे. युक्रेनच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गव्हर्नर व्हॅलेंटीन रेझनिचेन्को यांनी सांगितले की, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.