भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि फ्रान्सचे परराष्ट्र व्यापार मंत्री लॉरेंट सेंट-मार्टिन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पॅरिस: फ्रान्सचे परराष्ट्र व्यापार मंत्री लॉरेंट सेंट-मार्टिन यांनी मंगळवारी (3 जून) भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीदरमन्यान भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारावर चर्चा झाली. दरम्यान या भेटीनंतर भारत आणि युरोपीय संघातील मुक्त व्यापार करार (FTA) लवकरच पूर्ण होईल, अशी आशा लॉरेंट यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही बाजूंनी व्यापार युद्धच नव्हे, तर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात येईल. हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आणखी काय म्हणाले लॉरेंट सेंट-मार्टिन?
युरोपिय संघात फ्रान्स आणि जर्मनीसह २७ देशांचा समावेश आहे. हा संघ भारताशी आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. लॉरेंट सेंट-मार्टिन यांनी म्हटले की, “भारत फ्रान्सच्या प्रमुख भागीदार आहे. तसेच युरोपीय संघही या करारासाठी चर्चा पुढे नेऊ इच्छित आहे.” लॉरेंट यांनी असेही स्पष्ट केले की, सरंक्षण क्षेत्र हे भारत आणि फ्रान्सच्या दृढ संबंधाचे उत्तम उदाहरण असल्याचे लॉरेंट यांनी म्हटले.
दरम्यान या भेटीमुळे पियुष गोयल यांच्या नेतृत्त्वाखाली ५० हून अधिक सदस्यांचे व्यापर प्रतिनिधीमंडळ फ्रान्समध्ये आले आहे. गोयल यांनी जागतिक व्यापारातील अनिश्चितता निर्माण झाली आहे, परंतु फ्रान्स आणि भारतामधील बैठका या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. लॉरेंट यांनी भारत आणि फ्रान्सच्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधाना अधिक मजबूत करण्यावरही भर दिला.
या चर्चेमुळे भारत आणि युरोपीय संघातील मुक्त व्यापार कराराला लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत हा ऐतिहासिक करार पूर्ण होण्याची शक्यता आहें.