ढाका: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथी गट जमात-ए-इस्लामीला तुर्कीकडून मदत मिळत असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या गुप्तचर संस्थेकडून बांगलादेशी कट्टरपंथीयांना आर्थिक निधी, लॉजिस्टिकल मदत पुरवली जात आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, एर्दोगानच्या इस्लामिक अजेंडाला बांगलादेशात पुढे नेण्याचा प्रयत्न तुर्की करत आहे.
जमात-ए-इस्लाम या संघटनेचे पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेशी जुने संबंध आहे. यामुळेच आयएसआयच्या आदेशावरुन शेख हसीना यांच्याविरोधात हिंसक आंदोलने झाली होती. यामध्ये जमात-ए-इस्लामा या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीचा हेतू बांगलादेशात केवळ इस्लामिक अजेंडा वाढवण्याचा नाही, तर बांगालदेशाला आर्थिक मदतही करण्याचा आहे. ढाकातील मोगबाजार येथील जमातच्या कार्यलायाचे बांधकामासाठीही तुर्कीने मतद पाठवली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जमात-ए-इस्लामीची स्थापना १९४१ मध्ये इस्लामिक विचारवंत अबुल मौदुदी यांनी केली होती. स्वातंत्र्यानंतर बांगलादेशची फाळणी झाली, त्यावेळी शरिया कायद्याने शासित इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी बांगलादेशात प्रवेश केला. त्यावेशळी जमात-ए-इस्लामी पाकिस्तानी म्हणून ओळखले जायचे.
जमात-ए-इस्लाम संघटनेवर बंगाली मुस्लिमांवर अमानुष अत्याच्यार करण्याच्या आरोपाखाली शेख हसीना यांच्या सरकारने बंदी घातली होती. परंतु युनूस यांच्या अंतरिम सरकारची स्थापना झाली आहे जमात-ए-इस्लामवरील बंदी उठवली. त्यानंतर जमा-ए-इस्लामीची राजकीय पक्ष म्हणून देखील नोंदणी करण्यात आली.
सध्या बांगलादेशात एप्रिल २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणूकांची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगानने त्यांच्या जगभरात इस्लामिक अजेंडा वाढवण्याच्या हेतूला बांगलादेशातही सुरुवात केली आहे. तुर्की दक्षिण आशियातील इस्लामिक गटांमध्ये आपला प्रभाव वावत आहे. यामुळेचे जमात-ए-इस्लाम तुर्कीच्या विचारांशी जोडले गेले आहे.
यासाठी तुर्कीने दक्षिण आशियाई देशांमध्ये मुस्लिम लोकांसाठी धार्मिक चर्चासत्रांचे आणि कार्यशाळांचे देखील आयोजन केले आहे. बांगलादेशात जमात-ए-इस्लामी संघटनेच्या मदतीने हा प्रयत्न सुरु आहे.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था भारताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उद्देशाने बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामीसोबत धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा तुर्कीचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण आशियामध्ये निधी, शस्त्रे आणि अतेरिकी विचारांचा प्रचार करण्यास तुर्कीने सुरुवात केली आहे. यामुळे भारताच्या प्रादेशिक आणि अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.