इटली : इटलीमध्ये सध्या जी – 7 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घटक देशातील प्रतिनिधी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. भारताचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इटली दौऱ्यावर गेले आहे. पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा कारभारची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केले. दोन्ही देशाच्या पंतप्रधानामध्ये विकासाबाबत द्वीपक्षीय बैठक पार पडली.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच जी-७ परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. तसेच संरक्षण आणि या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली, दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्य भविष्यात आणखी वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध वाढवण्याबाबत देखील आवाहन केलं. याबाबत काही दिवसांपूर्वी औद्योगिक मालमत्ता अधिकारांबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याचे देखील दोन्ही देशाच्या नेत्यांनी मनःपूर्वक स्वागत केलं.
PM Modi met Italian PM Giorgia Meloni in Apulia, Italy. PM Meloni congratulated PM for his third consecutive term as Prime Minister. PM Modi thanked PM Meloni for the invitation to participate in G7 Outreach Summit and conveyed his appreciation for the successful conclusion of… pic.twitter.com/Nj20tq5Ua4
— ANI (@ANI) June 14, 2024
काय आहे यशवंत घाडगे स्मारक?
इटलीमध्ये यशवंत घाडगे या मराठी सैनिकाचे स्मारक आहे. या स्मारकाचा विकास व्हावा याबाबत पंतप्रधान मोदी व पंतप्रधान मेलोनी यांच्यामध्ये चर्चा झाली. इटलीतील मॉन्टोन शहरात दोन वर्षांपूर्वी तिथल्या सरकारने दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलं आहे. यशवंत घाडगे हे मूळचे रायगडचे रहिवासी होते. ते भारतामध्ये इंग्रज सत्तेत असताना असताना भारतीय लष्करात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सरकारची पिछेहाट होत असताना त्यांनी भारतीय सैनिकांनाही या युद्धात उतरवलं. भारतीय सैनिक तेव्हा मित्र राष्ट्रांच्या बाजूने आणि जर्मनीविरोधात लढले. इटलीतील टायबर नदीच्या किनाऱ्यावर ब्रिटन सरकारने उतरवलेल्या एका सैन्यतुकडीत यशवंत घाडगे (शिपाई – मराठी लाईट इन्फेंट्री) देखील होते. या युद्धात त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च सन्मान असणाऱ्या व्हिक्टोरिया क्रॉस या किताबाने सन्मानित करण्यात आलं.