'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'चे होणार महासागरात विसर्जन? NASA च्या धक्कादायक निर्णयाचे कारण तरी काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नासाने दिलेल्या माहितीनुसार, हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासारगात सोडण्याची तयारी सुरु आहे. यामागचे कारण म्हणजे या स्थानकाचे मॉड्यूल, तसेच ट्रस आणि रेडिएटर्सची संरचना खराब होत चालली आहे. यामुळे अंतराळात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नासा पॅसिफिक महासागरातील पॉइंट निमोमध्ये आयएसएसला पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
‘भारत हा उत्तम….’ ; अमेरिकन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा; टॅरिफबाबत दिला सल्ला
दक्षिण महासागरातील एक क्षेत्र ज्याला पॉइंट निमो म्हणून ओळखले जाते. हे पृथ्वीवरील अत्यंत निर्जन ठिकाण मानले जाते. या ठिकाणी मानव, पशु-पक्षी, वनस्पतींचा देखील वास नाही. पॉइंट निमो न्यूझींडच्या किनाऱ्यापासून 3 हजार मैल आणि अंटार्क्टिकापासून 2 हजार मैल अंतरावर आहे. हे ठिकाणे गेल्या अनेक दशकांपासून खराब झालेल्या उपग्रहांसाठी आणि अंतराळयानांसाठी एक स्मशानभूमी केंद्र बनले आहे.
ISS चे व्यवस्थापन अमेरिकेच्या नासा, रशियाच्या रोसकॉसमॉस, जपानच्या जॅक्सा, युरोपच्या ईएसए आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी द्वारे केले जाते. पंरुत आता हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या वातावरण कक्षेतून बाहेर काढण्यात येणार आहे. यासाठी 150 अब्ज डॉलर्सचा खर्च होण्याची शक्यता आहे. स्पेसएक्स यासाठी एक डीऑर्बिट वाहन बनवणार आहे. याच्या मदतीने हे स्पेस स्टेशन पॉइंट निमोमध्ये सोडण्यात येईल.
नासाने दिलेल्या माहितीनुसार,अंतराळ स्थानकाला पाडण्या ऐवजी अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये ISS ला पृथ्वीच्या कक्षेतून अधिक वर ढकलण्याचा विचार होता,पण यामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. तसेच ISS चे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये विभाजन करुन त्याला संग्रहालयात ठेवले जाणार होते, मात्र यासाठी मोठा खर्चाची आणि जोखमीची गरज आहे. यामुळे हा पर्याय देखील नाकारण्यात आला. आता एका डिऑर्बिट व्हेईकलच्या मदतीने याला पाइंट निमोमध्ये सोडण्यात येणार आहे. यामध्ये पार्ट्स थोडसे जळनू जातील आणि नंतर त्यांचे तुकडे संशोधनासाठी वापरले जातील.
नासाने सांगितले आहे की, ISS पाडल्यानंतरी संशोधन सुरुच राहणार आहे. यासाठी खाजगी स्पेस स्टेशनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये Axion Space, Blue Origin, Voyager या कंपन्या काम करत आहेत. तसेच चीनचे Tiangong स्पेश स्टेशन देखील कार्यरत आहे. भारताने 2035 पर्यंत तर रशियाने 2030 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याची योजना आखली आहे.
ISS खाली आणताना काय घडेल?
ISS एक मोठी प्रयोगशाळा आहे. याचे वजन 430 टनांहून अधिक आहे. हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर 28 हजार किमी प्रतितास वेगाने फिरत असते. या स्पेस स्टेशनला खाली घेऊन येताना याचा काही भाग वातावरमात जळून नष्ट होईल आणि उरलेले भाग पॅसिफिस महासागरात सोडले जातील.






