इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर; शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तेल अवीव : इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत शुक्रवारी इराणवर हल्ला केला. इस्रायलने सकाळी 200 लढाऊ विमानांनी 6 ठिकाणी हल्ला केला, ज्यामध्ये अनेक अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले गेले. त्यानंतर याला प्रत्युत्तर देत इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला केला. शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत.
इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत, ज्यात लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांचा समावेश आहे. हवाई दलाचे कर्मचारी देखील मारले गेल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्स कमांडर हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणच्या राज्य माध्यमांनी केली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा बदला अत्यंत विनाशकारी पद्धतीने घेऊ, असा इशारा इराणने दिला होता. त्यानंतर लगेच हा हल्ला करण्यात आला.
दरम्यान, इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला केला. शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत. इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले होते. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत,
नातांझचे गंभीर नुकसान
इस्त्रायल संरक्षण दलांनी (आयडीएफ) केलेल्या हल्ल्यात इराणच्या मुख्य युरेनियम समृद्धीकरण सुविधा नाटांझ अणुस्थळाचे बरेच नुकसान झाले आहे. या हल्ल्यात जमिनीखाली बांधलेल्या केंद्राच्या भागावरही परिणाम झाला. तेथे युरेनियम शुद्धीकरण यंत्रे (सेंट्रीफ्यूज), इलेक्ट्रकल रूम आणि इतर आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा होत्या.