India-Iran: इराणच्या सर्वोच्च नेत्याचा PM मोदींना खास संदेश; माजी नेत्याच्या अंत्यविधीला जाणार का Modi? भारताचा मोठा निर्णय समोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran Supreme Leader message to PM Modi 2026 : भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक आणि ऐतिहासिक संबंधांमध्ये आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवा टप्पा सुरू झाला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रथमच संबोधित करत एक विशेष संदेश पाठवला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या दृष्टीने या घडामोडीकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदींनी पाठवलेल्या ईद-उल-अझहाच्या शुभेच्छांबद्दल इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. इराणच्या सर्वोच्च पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी भारताविषयी आणि भारताच्या नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या आपल्या पत्रात अयातुल्ला सय्यद मोजतबा खामेनी यांनी लिहिले की, “भारत प्रजासत्ताकाचे आदरणीय पंतप्रधान, नरेंद्र मोदी, मला ईद-उल-अझहाच्या शुभप्रसंगी आपला अभिनंदनाचा संदेश मिळाला. मी यासाठी आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि आपलेही अभिनंदन करतो.” त्यांनी पुढे दोन्ही देशांच्या संबंधांवर भर देत लिहिले, “मला पूर्ण खात्री आहे की, परस्पर आदर आणि समान हितसंबंधांवर आधारित आपल्या दोन देशांमधील ऐतिहासिक मैत्री, आपल्या दोन्ही सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतून अधिक दृढ आणि विस्तारित होईल. मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे भारत सरकार आणि भारतातील महान लोकांच्या समृद्धी आणि निरंतर यशासाठी प्रार्थना करतो.” त्यांच्या या संदेशामुळे आगामी काळात भारत आणि इराणमधील व्यापार आणि सामरिक भागीदारीला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात ‘त्या’ दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?
दुसरीकडे, इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाबाबत भारताचा अधिकृत निर्णय आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अंत्यविधीसाठी तेहरानचा दौरा करणार नाहीत. इराणमध्ये होणाऱ्या या विधींमध्ये भारताच्या वतीने बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा हे उपस्थित राहून भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विधींना उपस्थित राहण्यासाठी औपचारिकपणे आणि आग्रहाचे निमंत्रण दिले होते. तथापि, पंतप्रधान मोदी याच काळात इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वनियोजित आणि अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर असल्याने ते इराणला जाऊ शकणार नाहीत.
🇮🇷 In his latest statement, Iran’s Supreme Leader Mojtaba Khamenei says the U.S. and Israel have effectively “confessed” to committing war crimes against Iran and vows to pursue their leaders in domestic and international courts. He accused both countries of killing civilians,… https://t.co/3g7Vt9mVex pic.twitter.com/Ih5Pe2Df72 — Mario Nawfal (@MarioNawfal) June 28, 2026
credit – social media and Twitter
गेल्या आठवड्यातच राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी हे निमंत्रण पाठवले होते. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले होते. त्यानंतर हे अंत्यविधी मूळतः मार्च महिन्यात होणार होते, परंतु संपूर्ण पश्चिम आशियामध्ये (Middle East) सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते. आता हे अधिकृत कार्यक्रम जुलै महिन्यात इराणच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये काही दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित केले जाणार आहेत, जिथे जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
Both @atahasnain53 @PmargheritaBJP will travel to Iran soon to represent Indian govt at the state funeral of Iran’s Supreme Leader Ayatollah Seyyed Ali Khamenei. Iran had extended invite last week for attendance at the ceremony. https://t.co/NiqFPyl4EM — Sidhant Sibal (@sidhant) June 29, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले
राजनैतिक तज्ञांच्या मते, इराणच्या अंतर्गत रचनेत झालेल्या बदलानंतरही भारतासोबतचे संबंध दृढ ठेवण्यास तिथले नवे नेतृत्व उत्सुक आहे, हे मोजतबा खामेनी यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. चाबहार बंदराचा विकास असो किंवा मध्य आशियातील व्यापार मार्ग, भारत आणि इराण एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे भागीदार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे रद्द झाला असला, तरी भारताने वरिष्ठ पातळीवरील शिष्टमंडळ तेहरानला पाठवून इराणसोबतच्या आपल्या मैत्रीचा आदर राखला आहे. येत्या काळात पूर्व आशिया आणि पश्चिम आशियातील बदलत्या समीकरणांमध्ये ही मैत्री कशी पुढे जाते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






