इस्रायलचा गाझावर एअर स्ट्राईक! इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला, विद्यापीठाआड हमासच्या अभियंत्याच सुरु होतं ट्रेनिंग

नवीनतम अपडेट देताना, इस्रायली हवाई दलाने सांगितले की त्यांच्या लढाऊ विमानांनी बुधवारी गाझा येथील इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला. इस्रायली हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हमासचे दहशतवादी या विद्यापीठात प्रशिक्षण घेत असत. हमासच्या अभियंत्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले.

    इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या चार दिवसांपासून युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धात 1100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनीही मारले गेले. इस्रायलच्या सीमेत आता 1500 हून अधिक हमास दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचा इस्रायली लष्कराने दावा केल्यानंतर आता इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीत एअर स्ट्राईक (Israel Air Strike On Gaza) केला आहे. इस्रायली हवाई दलाने ताज्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या लढाऊ विमानांनी गाझा येथील इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला आहे. या विद्यापीठात हमासच्या अभियंत्याना ट्रेनींग देण्यात येत असल्याचा दावा इस्रायली हवाई दलाने केला आहे.

    इस्रायलचा गाझावर एअर स्ट्राईक

    मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गाझा पट्टीत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु आहे. नुकतचं इस्रायलने इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला. इस्रायली हवाई दलाचा दावा आहे की हे विद्यापीठ हमासच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देणारा मोठा तळ होता. या विद्यापीठात हमासच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा इस्रायली हवाई दलाने केला आहे. इस्रायलचा दावा आहे की हे विद्यापीठ गाझासाठी राजकीय आणि लष्करी युनिट म्हणून काम करत होते. प्रशिक्षण घेतल्यानंतर अभियंते हमाससाठी शस्त्रे बनवत असत. इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांच्या युद्धविमानांनी गाझावर 200 हून अधिक लक्ष्यांवर रात्रभर हल्ले केले. दरम्यान, या युद्धात दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या 3500 च्या पुढे गेली आहे. तर दोन्ही बाजूचे जवळपास 10,000 लोक जखमी झाले आहेत.

    विद्यापीठाच्या अनेक इमारती उद्ध्वस्त

    विद्यापीठाचे अधिकारी अहमद ओरबी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक विद्यापीठाच्या काही इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. बॉम्बस्फोटानंतर विद्यापीठाला आग लागली आणि कचरा रस्त्यावर पसरला. एएफपीच्या वार्ताहराने सांगितले की इमारत कोसळल्यामुळे आकाशात धुळीचे दाट ढग पाहायल मिळत आहे.