फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नेता हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर, संघटनेने हिजबुल्लाहचा नवीन उत्तराधिकारी म्हणून उपसचिव नईम कासिम यांची निवड केली आहे. हसन नसराल्लाहसह आणि इतर अनेक वरिष्ठ नेते देखील या हल्ल्यात मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात संस्थापक सदस्य फौद शुकर, कमांडर अली कराकी, सेंट्रल कौन्सिलचे उपप्रमुख नबिल कौक, ड्रोन युनिट प्रमुख मोहम्मद सरूर, क्षेपणास्त्र युनिट प्रमुख इब्राहिम कुबैसी, ऑपरेशन कमांडर इब्राहिम अकील आणि वरिष्ठ कमांडर मोहम्मद नासेर यांचा समावेश आहे.
हिजहुल्लाने निवडला नवीन प्रमुख
इस्रायलने हिजबुल्लाच्या सर्वोच्च नेतृत्वाला जवळपास पूर्णतः संपवले आहे. मात्र आता हिजबुल्लाने त्याचा नवीन उत्तराधिकारी नेमला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नईम कासिम हिजबुल्लाच्या स्थापनेपासून संघटनेचा एक महत्त्वपूर्ण सदस्य राहिला आहे. कासिम हे 1991 पासून हिजबुल्लाच्या उपप्रमुख पदावर कार्यरत असून, ते नसराल्लाहचे दीर्घकालीन सहकारी आणि विश्वासू साथीदार मानले जात होते.
BREAKING: Lebanon’s Hezbollah elected its deputy secretary general Naim Qassem to succeed slain head Hassan Nasrallah https://t.co/99QC0wfzJI
— Reuters (@Reuters) October 29, 2024
इस्रायलविरुद्धचा लढा सुरूच ठेवण्याचे आश्वासन- नईम कासिम
नसराल्लाहच्या नेतृत्वात कासिम हिजबुल्लाचा ‘नेता नंबर-टू’ म्हणून कार्यरत होते. त्यांच्या संघटनेबद्दलच्या निष्ठेचे आणि आवेशाचे कौतुक करून शूरा कौन्सिलने त्यांची प्रमुखपदी निवड केली आहे. हिजबुल्लाने कासिमच्या नेतृत्वात नसराल्लाह यांच्या धोरणांचे पालन करण्याचे वचन दिले आहे आणि इस्रायलविरुद्धचा लढा सुरूच ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर कासिमने इस्रायलविरोधात कडक भूमिका घेतली आहे.
15 ऑक्टोबर रोजी तेहरानमध्ये दिलेल्या भाषणात कासिमने स्पष्ट केले की, जोपर्यंत युद्धविराम होत नाही, तोपर्यंत हिजबुल्ला आपल्या कारवाया थांबवणार नाही. इस्रायलकडून कासिम हे पुढील लक्ष्य असू शकतात, असे मानले जात आहे. यामुळे मध्य पूर्वेत इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील तणाव अधिक गडद होत चालला आहे.
इस्त्रायलची दक्षिण लेबनॉनमध्ये कारवाई सुरूच
इस्रायलचे सैन्य 23 सप्टेंबरपासून दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या ठाण्यांवर हवाई हल्ले आणि लष्करी कारवाया करत आहे. या कारवाईदरम्यान 27 सप्टेंबर रोजी नसराल्लाह ठार झाला. इस्रायली हल्ल्यामुळे दक्षिण लेबनॉनमध्ये तणाव वाढला असून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात संघर्ष तीव्र झाला आहे. कासिमच्या नेतृत्वात हिजबुल्ला इस्रायलच्या आक्रमणाला प्रतिकार करण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे, आणि येत्या काळात या संघर्षाची दिशा कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा- उत्तर कोरियाने रशियाला पाठवली 10 हजार सैनिकांची मदत; पेंटागॉनने केली चिंता व्यक्त