इमॅन्युएल मॅक्रोनवर का वैतागल्या जॉर्जिया मेलोनी? दोघांमधील खुसफूस कॅमेऱ्यात कैद.. पाहा VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: नुकतेच कॅनडामध्ये G-7 देशांच्या गटाची शिखर परिषद सुर झाली आहे. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधाने नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. तसेच या G-7 देशांमध्ये अमेरिका, जपान, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, आणि ब्रिटन या देशांच्या समावेश आहे. सध्या या परिषदेतील फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इटलीच्या पंतप्रधान खुसफूस करताना दिसत आहे.
याच वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मेलोनींना असे काही म्हणाले की त्यांनी आपले डोळे फिरवले आहेत. हे दृश्य कॅमरात कैद झाले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कॅनडाच्या अल्बर्टा येथे ५१ व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगातील महाशक्तीशाली देशांचा समावेस आहे. या परिषेदत नेते व्यापर, सुरक्षा आणि तंत्रज्ञानासह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. खर तरं एक वर्षापूर्वी याच परिषदेत इटील आणि् फ्रान्समध्ये वाद झाला होता. परंतु यावेळी दोन्ही देशांचे नेते शेजारी बसले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परिषदेत बोलत असताना हे घडले. यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मेलोनी यांच्याकडे झुकले आहे त्यांच्या कानात कुजबूजले. यावेळी मेलोनी यांनी त्यांना थम्सअप करुन प्रतिसाद दिला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा मॅक्रॉन यांनी तसेच केले. यावेळी मेलोनी यांनी त्यांच्या तोडांवर हात ठेवाला होता. त्यानंतर त्यांनी मॅक्रॉन यांच्याकडे बघत डोळे फिरवले.
🚨 WATCH: Georgia Meloni ROLLS HER EYES at France’s President Emmanuel Macron.
The G7 is off to such a good start. Meloni is awesome, she can’t hide her distain for the globalist elite. pic.twitter.com/yoo9eTA0ap
— mistersunshinebaby (@mrsunshinebaby) June 16, 2025
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आमंत्रण दिले होते. भारत हा या परिषदेचा सदस्य नाही, परंतु आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व पाहता कार्नी यांनी हे आमंत्रण दिले होते.