फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरूत: हिजबुल्लहाच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल त्यांच्या ठिकांणाना लक्ष्य करत सातत्याने हल्ले करत आहे. इस्त्रायलने हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत काही दिवसांपूर्वीच इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले होते. त्यानंतर त्यांनी लेबनॉनमधील नागरी संरक्षण केंद्रावर देखील हवाई हल्ले केल. ज्यामध्ये 5 डाक्टरांचा मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांमध्ये इस्त्रायली लष्कराने हमास आणि हिजबुल्लाहच्या 230 हून अधिक ठाकाणांना लक्ष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. या संघर्षाचे परिणाम लेबनॉनच्या राजधानी बेरूतवर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आता इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या बेरूतमधील ठिकाणांवर लक्ष्य करत हवाई प्राणघात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू तर 117 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला इस्त्रायलच्या तिसऱ्या मोठ्या हवाई मोहिमेचा भाग असून यामुळे बेरूतमध्ये आणखी विनाशकारी स्फोट झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्याची माहिती दिली.
दुसऱ्या हिजबुल्ला सदस्याच्या मृत्यूचा दावा
हिजबुल्लाह संघटनेला लक्ष्य करून इस्रायलने आपली मोहीम आणखी तीव्र केली आहे. लेबनीज सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला हिजबुल्ला सदस्याच्या विरोधात करण्यात आला होता. इस्रायलने या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र हिजबुल्ला सदस्यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक मोठे स्फोट झाले, ज्यामुळे शहरातील दाट इमारतींमधून धुराचे लोट उठले होते असे स्थानिक माध्यमांनी या विध्वंसाची माहिती देताना सांगितले.
इस्त्रायलची रणनिती बदलली
आता इस्रायलची आपली रणनीती बदलली आहे आणि पूर्वीच्या दक्षिण बेरूतवरील हल्ल्यांऐवजी मध्य बेरूतला लक्ष्य केले आहे. यासोबतच, इस्रायली भूदलाने लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मुख्यालयावर गोळीबार केला आहे. या गळीबारात दोन शांतता सैनिक जखमी झाले आहेत. इस्त्रायल-लेबनॉन संघर्ष आणखी उग्र होत चालला आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड हानी सोसावी लागत आहे. संपूर्ण क्षेत्रातील स्थिती अत्यंत अस्थिर बनली आहे, आणि दोन्ही बाजूंनी होणारे हल्ले शांती स्थापन करण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहोचवत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर या संघर्षाकडे लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून नागरिकांचे जीव वाचवण्यास मदत होईल.
हे देखील वाचा- इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश; नेमकं कारण काय?