'इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद' ; पंतप्रधान नेतन्याहू यांनी PM मोदींचे मानले आभार, कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israeli PM Thanks PM Modi : जेरुसेलम : रविवारी (७ सप्टेंबर) इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू, तर १२ जखमी झाले होते. या हल्ल्याचे वर्णन करताना दहशतवादाला शाप असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले. यावेळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त केला, तसेच दहशतवादाविरोधा इस्रायलला भारताचा पाठिंबा असेल असेही म्हटले. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींची आभार मानले आहेत.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दहशतवादाविरोधात इस्रायलच्या पाठीशी राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंर्भात एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायलच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि आपल्या सर्वांसाठी धोका निर्माण करण्याऱ्या दहशतवादाच्या शापाविरुद्ध पाठींबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार.”
पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा निषेध
सोमवारी पंतप्रधान मोदींनी इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याला विरोध करत एक्सवर पोस्ट केली होती, याच पोस्टला नेतन्याहूंनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप नागरिंकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या होत्या. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, इस्रायलची राजधानी जेरुसेलममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. तसेच पीडीतांच्या कुटुंबीयांप्रतीही मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी ही प्रार्थना करतो. भारत सर्व प्राकराच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशवादाविरोधी धोरणावर ठाम राहतो.
Thank you Prime Minister @narendramodi for standing with Israel and against the scourge of terror that threatens us all. 🇮🇱🇮🇳 https://t.co/aeVC0hvG0Z
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) September 8, 2025
हमासकडून हल्ल्याचे समर्थन
दरम्यान हमासने या हल्ल्याचे समर्थन केले असून याला एक मोठी आणि वीर कारवाई म्हटले आहे. हमासने त्यांच्या लोकांविरोधात सुरु असलेल्या गुन्ह्यांना आणि विनाशाला एक उत्तर प्रतिसाद असल्याचे म्हटले आहे. परंतु इस्रायलमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
कुठे आणि कधी झाला हल्ला?
रविवारी (०७ सप्टेंबर) इस्रायलच्या जेरुसेलममध्ये एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला होता. यामध्ये १२ जखमी झाले होते, सध्या यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच यात पाचजण ठार झाले आहेत. हा हल्ला जेरुसेलमच्या रामोट जंक्शनवर झाला होता.
कोणी केली हल्ला?
इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केला असून या हल्ल्यात अत्याधुनिक बंदूकांचा वापर करण्यात आला. दोन दहशतवाद्यांनी बसमधील प्रवाशांवर गोळीबार केला आणि फरार झाले.