पोलिसाचे ई-चालान मशीन फोडले
छत्रपती संभाजीनगर : वाहतूक नियमन करत आणि असलेल्या कर्मचाऱ्यावर राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वार त्याच्यासोबतच्या महिलेने शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत ट्रॅफिक चालानचे डिव्हाईस मशीन फोडले. ही घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी मिलकार्नर परिसरात घडली. वाहतूक शाखेचे जमादार सोमनाथ बाबुराव जाधव (वय ५३) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, सध्या फिर्यादी हे शहर वाहतूक शाखा-२ मध्ये नेमणूक आहे.
गुरुवारी ते मिलकॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत जमादार मडावी, वाघमारे व उपनिरीक्षक शिखरे हे अधिकारी उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास (एमएच-२०-जीबी-९२४९) ही दुचाकी बारापुला गेटकडून राँग साईडने चौकात आली. डबलसीट बसलेले चालक व महिला नियमभंग करत असल्याने जाधव यांनी चालान डिव्हाइसद्वारे त्यांचा फोटो घेतला. मात्र, हे पाहताच चालकाने दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी आडवी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
दरम्यान, दुचाकी बाजूला घेण्यास सांगताच चालक आणि महिला दोघांनीही मोठमोठ्याने बोलत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याचवेळी ती महिला अचानक जाधव यांच्या अंगावर धावून आली आणि त्यांच्या हातातील चालान मशीनला जोराचा फटका देत खाली पाडले. यात मशीन फोडून बंद पडले. यानंतर ते दोघेही त्याच दुचाकीवर बसून पसार झाले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.
डॉक्टरची चार वर्षांच्या मुलाला मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. डेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला दंतचिकित्सकाने अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना डॉक्टरसह कम्पाउंडरने शिवीगाळ केल्याचा प्रकार देखील घडला.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…






