होर्मुझ सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व
होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारा अरुंद सागरी मार्ग आहे. एका बाजूला इराण असून दुसऱ्या बाजूला ओमान व संयुक्त अरब अमिराती आहेत. जगातील सुमारे २० टक्के खनिज तेलाची वाहतूक याच मार्गे होते. त्यामुळे ही सामुद्रधुनी तेल वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात महत्त्वाची चौकी मानली जाते. या मार्गाचा सर्वात अरुंद भाग केवळ ३३ किमीचा असून, जहाजांची मुख्य वाहतूक आणखी अरुंद मार्गातून केली जाते, ज्यामुळे हे ठिकाण सहज लक्ष्य ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर आमच्यावर हल्ला झाला तर अमेरिकन सैन्य…’, इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्पची खामेनेईंना सक्त Warning
इराणच्या इशाऱ्याचे संभाव्य परिणाम
जर इराणने ही सामुद्रधुनी बंद केली, तर त्याचा परिणाम थेट तेलाच्या किमतीवर होईल. तेलाचा पुरवठा खंडित झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल दरात लक्षणीय वाढ होईल. याचा फटका फक्त तेल आयात करणाऱ्या देशांनाच नव्हे, तर एकंदर जागतिक व्यापार व्यवस्थेलाही बसू शकतो. तसेच, इस्रायलशी सुरू असलेला संघर्ष अधिक उग्र होण्याची शक्यता आहे.
Iranians talking about closing the strait of Hormuz. I knew this would eventually happen. Look up strait of Hormuz and read up on its strategic importance in global oil and petroleum shipment. Oil prices will hit the roof and put an enormous pressure on global economy. And the… pic.twitter.com/fy1Nq9FFwQ
— J. C. Okechukwu (@jcokechukwu) June 14, 2025
credit : social media
इतिहासातही दिसलेले संघर्षाचे पडसाद
१९८० ते १९८८ दरम्यान इराण-इराक युद्धाच्या काळातही सामुद्रधुनीवरून व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्यात आले होते. तथापि, सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली नव्हती. २०१९ मध्ये अमेरिकेच्या फुजैराह किनाऱ्यावर जहाजांवर हल्ले झाले होते, ज्यामागे अमेरिका इराणचा हात असल्याचे म्हणत होती. अशा प्रकारे, ही सामुद्रधुनी संघर्षाच्या काळात सतत धोक्यात राहिली आहे.
अमेरिका व इस्रायलचा संभाव्य प्रतिसाद
जर इराणने प्रत्यक्षात सामुद्रधुनी बंद केली, तर अमेरिका त्यास प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायल यांचे नौदल या भागात सतत तैनात असते. इस्रायलने अलीकडेच इराणी लष्करी आणि अणु ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणनेही प्रत्युत्तरादाखल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. अमेरिका थेट हल्ल्यात सहभागी नसल्याचे म्हटले जात असले तरी, परिस्थिती चिघळल्यास अमेरिका हस्तक्षेप करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलने अवकाशातच पाडले इराणी क्षेपणास्त्र; ‘Arrow 3’ प्रणालीने जगाला केले चकित
इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी
इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा हा केवळ धमकी नसून एक गंभीर दबाव तंत्र आहे. जर इराणने प्रत्यक्ष कारवाई केली, तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळे येत्या काळात या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे निर्णय घेतले जातील, हे निश्चित आहे.