इटलीचा मोठा निर्णय! महिलेवर अत्याचार किंवा तिची हत्या करणाऱ्यांना आता थेट 'आजीवन कारावास' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर
इटलिच्या संसदेत महिलांवरील अत्याचाराल रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण कायदा मंजूर करण्यात आला आहे. खासदारांनी स्री हत्या केवळ हत्या नसून गंभीर गुन्हा असल्याचे मान्य करत या प्रकरणातील दोषींना आता कठोर शिक्षा सुनावली जाणार असल्याचे म्हटले आहे. इटलीमध्ये गेल्या वर्षी २०२४ मध्ये १६६महिलांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये महिलेचा जोडीदार किंवा एक्स जोडीदार आरोपी असल्याचेही आढळून आले होते.
यामुळे इटलीमध्ये अनेक तासांच्या चर्चेनंतर महिलांवरील अत्याचारांविरोधात जन्मठेपेच्या शिक्षेचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान मेलोनी यांचे सरकार आणि विरोध पक्षांनी संयुक्तपणे हा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार, लिंगावरुन कोणत्याही स्त्रीची हत्या करण्यास आली तर त्याला थेट जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे.
याशिवाय ज्युलिया नावाच्या महिलेच्या हत्येमुळे संपूर्ण इटली हादरली होती. ज्युलियाला तिच्या एक्स पतीने चाकू भोकसून क्रूरपणे मारुन टाकले होते. नंतर तिचा मतदेह एका पिवशीत भरला आणि तलावाजवळ फेकून दिला होता. या घटनेने संपूर्ण इटलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणानंतर इटलीतील महिलांमध्ये सरकारविरोधात तीव्र रोष वाढला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार, महिला पंतप्रधान असणाऱ्या देशात अशा गोष्टी घडणे अविश्वसनीय आहे. तीन वर्षापूर्वी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांची निवड करण्यात आली होती. यामुळे लोकांना आशा होती की त्यांच्या नेतृत्त्वात देशात महिलांच्या सुरक्षितता आणि समानतेला प्राधान्य दिले जाईल. परंतु मेलोनी सरकार हे आश्वान पूर्ण करण्यात अपयशी ठरले.
इटलीमध्ये आधीपासून महिलांवरील अत्याचार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा, तर काही प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा नमूद आहे. यामुळे सध्या मेलोनी सरकाच्या या कायद्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांच्या मते, हा कायदा व्यापक असून त्याला न्यायालयात सिद्ध करणे कठीण होईल.
तज्ज्ञांच्या मते इटलीत केवळ कायदा आणण्याचीच गरज नाही, लिंग समानता आणणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शिक्षा वाढवण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध लादणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून लैंगिक शिक्षण दिल्यास घरगुती हिंसाचार, लिंगभेद आणि नातेसंबंधातील असुरक्षितता कमी होऊ. पण आजही इटलीच्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले नाही.
Ans: इटलीने महिलांवरील अत्याचाराविरोधात एक नवा कायदा मंजूर केला आहे, ज्याअंतर्गत महिलांवर अत्याचार करणाऱ्या किंवा तिची हत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येईल.
Ans: मेलोनी सरकाच्या या कायद्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांच्या मते, हा कायदा व्यापक असून त्याला न्यायालयात सिद्ध करणे कठीण होईल.
Ans: तज्ज्ञांच्या मते इटलीत केवळ कायदा आणण्याचीच गरज नाही, लिंग समानता आणणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शिक्षा वाढवण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध लादणे महत्त्वाचे आहे. तसेच लैंगिक शिक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे.






