17 वेळा चाकूने भोसकले, मृतदेहावर चालवली कार; अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाचं कृत्य

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिलिप मॅथ्यू (Philip Mathew) असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे, तर मेरीन जॉय असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

    या घटनेनंतर जॉयचे सहकारी तिच्या मदतीला धावले. तेव्हा जॉय फक्त ‘माझ्या पोटात बाळ आहे,’ असं वारंवार ओरडत होती. जॉयने तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या हल्लेखोराची माहिती दिली. ज्यामुळे अखेरीस आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मॅथ्यूने आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणातील आरोपांना आव्हान न देण्याची विनंती केली. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

    याशिवाय, पत्नीवर प्राणघातक शस्त्राने गंभीर हल्ला केल्याबद्दल त्याला आणखी पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. आरोपी मॅथ्यूने आरोपांना आव्हान न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

    घटस्फोटावरून वाद

    जॉय ही मॅथ्यूसोबत तिचं नाते संपवण्याचा विचार करत होती. पण तत्पूर्वीच तिची हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना स्टेट अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्या पॉला मॅकमोहन यांनी सांगितलं की, संबंधित प्रकरणातील आरोपांना आरोपी मॅथ्यूने आव्हान न देण्याचा निर्णय घेतला आहे.