• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Largest Snake Ever Indias Vasuki Or Colombias Titanoboa

मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’

Vasuki Indicus vs Titanoboa : सुमारे 58 ते 60 दशलक्ष वर्षांपूर्वी पॅलेओसीन युगात, कोलंबियामधील सेरेजोन दलदलीत एक भव्य साप वावरत होता  टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस. आता वाचा याबाबत रंजक माहिती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 13, 2025 | 12:30 PM
Largest snake ever India's Vasuki or Colombia's Titanoboa

पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील 'वासुकी' की कोलंबियाचा 'टायटानोबोआ'? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Vasuki Indicus vs Titanoboa : साप म्हणजेच नाग हे नाव ऐकले तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण कल्पना करा, जर सापाची लांबी १५ मीटर आणि वजन तब्बल १ टनाच्या आसपास असेल तर? हो, अशा महाकाय सापांचा अस्तित्व खरोखरच पृथ्वीवर होता आणि त्यांच्यात सर्वात मोठा कोण होता, यावर सध्या वैज्ञानिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. भारताच्या गुजरातमधून सापडलेला ‘वासुकी इंडिकस’ आणि कोलंबियामध्ये सापडलेला ‘टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस’ या दोन प्राचीन सर्प प्रजातींच्या तुलनेत कोणता खरा “सर्प सम्राट” होता, यावर आता प्रकाश पडू लागला आहे.

टायटानोबोआ  सर्वात भव्य आणि वजनदार साप

सुमारे ५८ ते ६० दशलक्ष वर्षांपूर्वी पॅलेओसीन युगात, कोलंबियामधील सेरेजोन दलदलीत एक भव्य साप वावरत होता  टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस. २००९ मध्ये या सापाचे जीवाश्म सेरेजोन कोळसा खाणीमध्ये सापडले आणि जगात खळबळ उडाली. सुरुवातीला हे मगराचे अवशेष आहेत, असे समजले गेले. पण जेव्हा त्याचे विश्लेषण झाले, तेव्हा उघड झाले की हा जीव म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा साप होता.

या टायटानोबोआची लांबी सुमारे १५ मीटर (५० फूट) इतकी होती आणि त्याचे वजन १.२५ टन होते. हे वजन आणि लांबी ही दोन्ही आजच्या कोणत्याही वाहनाच्या तुलनेत मोठी आहेत. टायटानोबोआ विषारी साप नव्हता, पण तो शिकार गुदमरून मारण्याचे तंत्र वापरत असे. तो बोआ आणि अ‍ॅनाकोंडा यांच्याशी संबंधित होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका! ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?

वासुकी इंडिकस, भारतात सापडलेला गूढ सर्प

टायटानोबोआसारखा दुसरा महाकाय साप भारताच्या गुजरातमधील पनाध्रो लिग्नाइट खाणीत सापडला. २००५ मध्ये येथे २७ मोठे कशेरुक सापडले, जे सुरुवातीला मगरीचे असल्याचे गृहित धरले गेले. पण तब्बल नऊ वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर, वैज्ञानिकांनी सांगितले की हे अवशेष एका अज्ञात सापाच्या प्रजातीचे आहेत.

या सापाचे नाव ‘वासुकी इंडिकस’ ठेवण्यात आले हिंदू पुराणांमधील शिवाच्या गळ्यातील नागराज वासुकीवरून. वासुकी सुद्धा १५ मीटर लांब आणि १ टन वजनाचा असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वासुकी आणि टायटानोबोआ दोघेही आकाराने जवळपास सारखे आहेत, मात्र वजनाच्या बाबतीत टायटानोबोआ थोडा मोठा ठरतो.

टायटानोबोआ विरुद्ध वासुकी कोण होता खरा नागसम्राट?

दोघांचे तुलनात्मक निरीक्षण करताना हे लक्षात येते की:

1. लांबी: दोघेही १५ मीटरपर्यंत वाढू शकतात.

2. वजन: टायटानोबोआ – १.२५ टन | वासुकी – १ टन

3. काळ: टायटानोबोआ – ५८-६० दशलक्ष वर्षांपूर्वी | वासुकी – ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी

4. ठिकाण: टायटानोबोआ – कोलंबिया | वासुकी – भारत (गुजरात)

यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की, टायटानोबोआला वजनात थोडा अधिक टोक मिळतो, पण वासुकीही काही कमी नाही. हे दोघेही आपापल्या काळातील उत्क्रांतीच्या शिखरावर होते. त्यांचा आकार, शरीराची रचना आणि जीवनशैली या सर्व बाबतीत आधुनिक सापांच्या तुलनेत ते अनेक पटीने पुढे होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Crisis 2025 : युद्धबंदीच्या आशा क्षीण! गाझामध्ये अन्न-पाण्याविना मृत्यूचे तांडव; 800हून अधिक बळी

एक अद्भुत वैज्ञानिक शोध

आज विज्ञानाच्या साहाय्याने आपण लाखो वर्षांपूर्वीच्या प्रजातींना शोधून त्यांचे स्वरूप आणि वैशिष्ट्य समजून घेऊ शकतो. वासुकी इंडिकस आणि टायटानोबोआ हे फक्त साप नव्हते, तर पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगणारे एक महत्त्वाचे पान होते. या दोन सर्पसम्राटांची गोष्ट विज्ञान, पुराणकथा आणि उत्क्रांतीच्या संयोगाने भरलेली आहे जी भविष्यात अजूनही अनेक रहस्य उलगडेल.

Web Title: Largest snake ever indias vasuki or colombias titanoboa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Africa Continent
  • amazon
  • History
  • india
  • Snake Found

संबंधित बातम्या

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर
1

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Onion Imports: कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बांगलादेशने दिली आयात परवानगी
2

Onion Imports: कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बांगलादेशने दिली आयात परवानगी

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर
3

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, तीन हप्ते मिळाले नसतील तर असा करा अर्ज, मिळेल पूर्ण परतावा
4

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, तीन हप्ते मिळाले नसतील तर असा करा अर्ज, मिळेल पूर्ण परतावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

Dec 08, 2025 | 12:30 AM
Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

Dec 07, 2025 | 11:47 PM
भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

Dec 07, 2025 | 11:23 PM
IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

Dec 07, 2025 | 10:03 PM
Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी

Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी

Dec 07, 2025 | 09:55 PM
भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

Dec 07, 2025 | 09:44 PM
Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Dec 07, 2025 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.