Living Nostradamus: ब्राझीलच्या ज्योतिष्याचं भाकीत झालं खरं? इराण-इस्राईल युद्धाबाबत दिला होता गंभीर इशारा! पुढे काय होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आता इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्राझीलच्या लिविंग नॉस्ट्राडेमसने या युद्धाचे भाकित आधीच केले होते, जे आता खरे होताना दिसत आहे. ब्राझीलचे प्रसिद्ध भविष्यकार एथोस सालोमे यांनी इराण-इस्रायलमधील युद्धावर भाकितं केले होते. एथोस सालोमे यांना लिविंग नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाते. सध्या त्यांच्या मध्य पूर्वेतील भविष्यवाणीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.
लिविंग नॉस्ट्राडेमसने 2023 मध्ये मध्य पूर्वेतील तणाव वाढणार असल्याचा गंभीर इशारा दिला होता. आता त्यांचा हा इशारा प्रत्यक्षात उतरलेला दिसत आहे.2024 मध्ये हे भाकित सत्यात उतरण्यास सुरुवात झाली. इस्रायलने सीरियातील इराणच्या राजनियक केंद्रावर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील इस्रायलवर शेकडो ड्रोन हल्ले केले.
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान पुन्हा एकदा 13 जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीव्र युद्ध सुरु झाले आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे.या तणावामुळे जागतिक राजकारणात गोंधळ उडाला आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. अनेकांनी एथोस सालोमे यांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे मान्य केले आहे.
राजकारण, इतिहास आणि धर्म या तिन्ही गोष्टींशी हा संघर्ष बांधला गेला आहे. परंतु सालोमे यांनी इशारा दिला होता की, हा संघर्ष केवळ एक छोटासा ट्रेलर असेल. पुढे जाऊन हे युद्ध आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. सध्या अनेक देशांकडून इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. यामुळे युद्धातमध्ये इस्रायलचे वर्चस्व अजूनही आहे. परंतु ही स्थिती बदलण्याची देखील शक्यता आहे. लिविंग नॉस्ट्रेडेमसचे म्हणणे आहे की, मध्य पूर्वेत राजकारण, धर्म आणि इतिहास या तिन्ही गोष्टींमुळे अस्थितरता कायम राहण्याची शक्यता आहे.
एथोस सालोमे यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर युद्धात होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगतिले की, येत्या काळातील युद्ध केवळ शस्त्रांवर नाही, एआयने देखील लढली जाणार आहेत.यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि इराणसारख्या युद्धात एआय युद्धात लष्करी क्षेत्रात वापर प्रभावी ठरेल. येत्या काळात जागतिक शांततेसाठी AI अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.