अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो
खगोलशस्त्रज्ञांसाठी आणि अंतराळवीरांसाठी 2026 वर्ष हे अत्यंत खास आणि नेत्रदीपक असेल . या वर्षी अनेक चंद्रग्रहण होणार आहे. पण यातील दोन चंद्रग्रहण अत्यंत दुर्मिळ असून ते पाहण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. या प्रक्रियेत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात. तसेच सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण पाहणे हे डोळ्यासाठी जास्त आरामदायी असते.
या वेळी 2026 चे पहिले चंद्रग्रहण हे मार्चमध्ये होणार आहे. 3 मार्च 2026 रोजी हे चंद्रग्रहण होणार असून हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आशिया आणि ऑस्ट्रेलिया, तसेच पॅसिफिक बेटांवर आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळेल. अमेरिकेच्या वेळेनुसार, पहाटे 3.44 वाजात चंद्रग्रहण सुरु होईल तर 9.23 वाजता संपेल. यानंतर ते भारतात दिसेल. पूर्ण चंद्रग्रहण हे नारंगी रंगाचे दिसू शकते. किंवा काहीसे लालसरही असेल. याला ब्लड मून देखील म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाश हा चंद्रावर विखुरलेला असतो. यामुळे हे चंद्रग्रहण घडते.
यानंतर दुसरे 2026 मधील शेवटचे चंद्रग्रहण हे ऑगस्टमध्ये 27-28 ला दिसेल. हे अमेरिका आणि युरोपमध्ये दिसणार आहे. हे आशिंक चंद्रग्रहण असणार असून आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्येही दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या वेळेनुसार, रात्री 9.22 वाजता चंद्र त्याच्या उपछायेत प्रवेश करेल आणि रात्री 10.30 वाजता पूर्ण सावतील प्रवेश करेल. यानंतर हे चंद्रग्रहण 3.03 वाजता संपणार आहे. परंतु हे चंद्रग्रहण भारतात पाहायला मिळणार नाही.
या चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राच्या एका भागावर पृथ्वीची सावली पडते, यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा एक भाग दिसेनासा होता. हे चंद्रग्रहण देखील पौर्णिमेच्या वेळी दिसते, उघड डोळ्यांनी हे पाहता येते.
चंद्रग्रहण का होतेय ट्रेंड? कारण वाचून तुम्हीही त्वरीत करा बघायचा प्लान
Ans: २०२६ मध्ये किती चंद्रग्रहणाचा अनुभव दोन वेळा घेता येईल एक मार्च महिन्यात पूर्म चंद्रग्रहण आणि ऑगस्टमध्ये आशिंक चंद्रग्रहण होणार आहे.
Ans: २०२६ मध्ये भारतात 3 मार्च रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव घेता येईल.






