नवी दिल्ली – युक्रेन-रशिया युद्धात रशियाला पराभूत करण्यासाठी प्रसिद्ध मेजर वादिम वोरोशिलोव यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हिरो घोषित केले आहे. रशियाच्या हवाई दलाला निर्भयपणे तोंड दिल्याबद्दल युक्रेनने त्यांना ‘ऑर्डर ऑफ द गोल्डन स्टार’ने सन्मानित केले आहे.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वदिम यांना सन्मानित करण्याच्या घोषणेप्रसंगी सांगितले की, युक्रेनच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे धैर्याने रक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. वादिम यांनी अत्यंत शौर्याने युक्रेनच्या लोकांची सेवा केली आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
ऑक्टोबर महिन्यात युक्रेनमध्ये वदिम यांचा एक सेल्फी घेतलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मेजर हे युक्रेनच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला. फोटोमध्ये तो रक्ताने माखलेला चेहरा घेऊन जळत्या मिग फायटर प्लेनमध्ये बसून सेल्फी घेताना दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, त्याचा हा सेल्फी रशियासोबतच्या लढतीनंतर जखमी झाल्याचा होता. युद्धादरम्यान, त्याच्यावर रशियन बाजूने हल्ला झाला, त्यानंतर त्याच्या मिग विमानाला आग लागली आणि त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली. अशा कठीण परिस्थितीतही थम्ब्स अप घेऊन सेल्फी काढत युक्रेनच्या लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले होते.