Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्.... मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १.३२ च्या सुमारास एका वॉटर व्हिलेजमध्ये आग लागली होती. सैंडकन जिल्ह्याचे अग्निशमन आणि बचाव प्रमुख जिमी लैगुंग यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या आगीत लाकडाटच्या खांबवल उभी असलेली घरे जळून खाक झाली आहे. घरे एकमेकांना लागू असल्याने काही वेळातच आगीने भयानक रौद्र रुप धारण केले होते. सध्या या अपघातात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला आग विझवताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. समुद्रात ओहोटी असल्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा नव्हता. तसेच लाकडू बांधकामामुळे आग प्रचंड वाढत होती. मिळालेला माहितीनुसार, सबा राज्याच्या सैंडकन भागात गरीब समुदाय, स्थानिक स्वदेशी लोेक आणि स्थलांतरित वास्तव करतात. या आगीमुळे लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४४५ नागरिक बेघर झाले असून सध्या त्यांना तात्पुरत्या मदत केंद्रात स्थलांतिरत करण्यात आले आहे. मलेशिया(Malaysia)चे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या घटनेवर तीव्र दुख व्यक्त केले आहे. त्यांनी बाधित कुटुंबाना अन्न, औषधे आणि तात्पुरता निवारा पुरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सध्या लोकांच्या नुकसान भरपाईचे आकलन सुरु आहे. पीडीतांच्या पुनर्वसनासाठी योजना आखली जात आहे.
सध्या या दुर्घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाने यासाठी तपास सुरु केला आहे. परंतु या घटनेमुळे ४०० हून अधिक लोकांवर दुखाचा डोंगर कोशळला आहे.
At least 200 homes have been destroyed in a major fire at the floating village of Kampung Bahagia in Sandakan, Malaysia, according to local reports. #NYI pic.twitter.com/Oa7AaJGcop — NewYork-Insight (@NewYork_Insight) April 19, 2026
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १.३२ च्या सुमारास मलेशियातील सबा जिल्ह्यात किनारपट्टीवरील एका गावात आगीची भीषण दुर्घटना घडली आहे.
Ans: या अपघातात कोणत्याही जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.






