इराणचे ४० टक्के ड्रोन आणि ६० टक्के क्षेपणास्त्र प्रक्षेपक सुरक्षित आहेत, बंकरमधून १०० हून अधिक यंत्रणा हटवण्यात आल्या आहेत, आणि तेहरान युद्धविरामाची तयारी करत आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran missile and drone capability 2026 : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) सध्या एका निर्णायक वळणावर आला आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा वापर इराण शांत बसण्यासाठी नाही, तर युद्धाच्या पुढच्या भयानक टप्प्यासाठी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी जो अंदाज वर्तवला आहे, त्याने पाश्चात्य जगाची झोप उडवली आहे. इराणकडे आजही इतकी लष्करी ताकद शिल्लक आहे की, ते एका महिन्यापेक्षा जास्त काळ जगातील सर्वात मोठ्या शक्तींशी दोन हात करू शकतात.
अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, इराणचे ६० टक्क्यांहून अधिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक (Missile Launchers) अजूनही सुरक्षित आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलने बॉम्बफेक करून प्रक्षेपक नष्ट केल्याचा दावा केला होता, त्या ढिगाऱ्यांतून इराणने अनेक यंत्रणा पुन्हा मिळवल्या आहेत. शस्त्रसंधीच्या काळात इराणने गुहांमध्ये आणि बंकरमध्ये लपवलेल्या जवळपास १०० यंत्रणा बाहेर काढल्या असून, त्यामुळे त्यांची ताकद आता ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. हे प्रक्षेपक कोणत्याही क्षणी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना लक्ष्य करू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RELOSA : 3000 सैनिक, 10 जेट विमाने, 5 युद्धनौका! होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
इराणच्या ड्रोन तंत्रज्ञानाने या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही इराणकडे ४० टक्के आक्रमक ड्रोन साठा शाबूत आहे. हे ड्रोन केवळ देखरेख करण्यासाठी नाही, तर आत्मघातकी हल्ले करण्यासाठी ओळखले जातात. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देखील सोशल मीडियावर इराणच्या या क्षमतेचे वर्णन करताना म्हटले की, “इराणने आपल्या लष्करी ताकदीची चाचणी होर्मुझच्या समुद्रात केली असून त्यांची क्षमता अमर्याद आहे.” इराणचा हा साठा सागरी वाहतुकीचे कंबरडे मोडण्यासाठी पुरेसा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
🇮🇱🇮🇷 According to an Israeli military official, they’re locked, loaded, and aimed at Iran: “We, and the Americans, are prepared for the possibility of a sudden collapse of the ceasefire with Iran. We have updated the target bank, and the Military Intelligence Directorate is… https://t.co/C1bEdKiZr5 pic.twitter.com/lT2dxaQjxX — Mario Nawfal (@MarioNawfal) April 19, 2026
credit – social media and Twitter
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला इराणने त्याच भाषेत उत्तर दिले आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी स्पष्ट केले आहे की, “आम्ही युद्धासाठी पूर्णपणे तयार आहोत. जर अमेरिकेने थोडी जरी चूक केली किंवा आमच्या सीमा ओलांडल्या, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.” पाकिस्तानमध्ये शांतता चर्चेचे वारे वाहत असले तरी, जमिनीवर इराणची तयारी मात्र एका मोठ्या संघर्षाचे संकेत देत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी
१९८० च्या दशकात इराकसोबतच्या युद्धात इराणने होर्मुझच्या समुद्रात भूसुरुंग पेरले होते. मात्र, आता इराणने आपली रणनीती बदलली आहे. भूसुरुंगांऐवजी आता ते हाय-टेक ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहेत. जागतिक तेल पुरवठ्याचा एक तृतीयांश भाग या मार्गावरून जातो आणि इराणकडे ही वाहतूक रातोरात रोखण्याची क्षमता आहे. गुप्तचर यंत्रणांचे अंदाज केवळ ढोबळ असले तरी, इराणच्या विनाशाची चर्चा करणाऱ्यांसाठी ही आकडेवारी एक मोठा इशारा आहे.
Ans: अमेरिकन अहवालानुसार इराणकडे आजही ४०% ड्रोन आणि ६०% ते ७०% क्षेपणास्त्र प्रक्षेपक सुस्थितीत आहेत.
Ans: इराणने शस्त्रसंधीच्या काळात जवळपास १०० क्षेपणास्त्र प्रक्षेपक यंत्रणा सुरक्षित गुहांमधून बाहेर काढून त्या युद्धासाठी सज्ज केल्या आहेत.
Ans: लष्करी तज्ज्ञांच्या मते, इराणकडे विना व्यत्यय एका महिन्यापेक्षा जास्त काळ लढण्याची क्षमता आणि शस्त्रसाठा उपलब्ध आहे.






