नोबेल पारितोषिक घेण्यासाठी मारिया मचाडो व्हेनेझुएलाहून नॉर्वेला पोहोचली; मायदेशात परतताच होणार अटक? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Maria Corina Machado Nobel Peace Prize : व्हेनेझुएलाच्या (Venezuela) लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठीचा सर्वात प्रमुख आवाज असलेल्या मारिया कोरिना मचाडो (María Corina Machado) यांनी अनेक महिन्यांच्या लपूनछपून राहिल्यानंतर अखेर नॉर्वेमध्ये पाऊल ठेवले. हे पलायन कोणत्याही सामान्य प्रवासापेक्षा चित्रपटातील कथेसारखे (Like a movie story) होते, कारण हे अत्यंत धोकादायक ऑपरेशन अमेरिकेच्या विशेष दलाचे माजी कर्मचारी ब्रायन स्टर्न यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले होते. मचाडो यांनी देशातून पलायन करण्याचा निर्णय घेतला कारण राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारकडून त्यांना आणि इतर विरोधी नेत्यांना अटक होण्याचा धोका होता. जवळपास एक वर्ष त्या लपून बसल्या होत्या. हे धोकादायक निर्वासन (Evacuation) ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी, माचाडो कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी वाहनांमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि सुरक्षा चौक्या टाळण्यासाठी गर्दीचे मार्ग टाळण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेतील सर्वात कठीण भाग (Most difficult part) होता समुद्रातील प्रवास. सुरक्षा संस्थांच्या बारीक देखरेखीपासून वाचण्यासाठी, रात्रीच्या अंधारात माचाडो यांना एका लहान बोटीतून समुद्रात नेण्यात आले. माजी अमेरिकन विशेष दलाचे अधिकारी ब्रायन स्टर्न यांनी हा प्रवास खूप कठीण असल्याचे वर्णन केले. आकाश काळे, जोरदार वारे वाहत होते आणि उंच लाटा उसळत होत्या. बोटीवर कोणतेही दिवे नव्हते, जेणेकरून कोणीही तिची उपस्थिती लक्षात घेऊ नये. सुमारे १३ ते १४ तास समुद्रात संघर्ष केल्यानंतर, त्या एका सुरक्षित ठिकाणी पोहोचल्या, जिथून त्यांनी नॉर्वेसाठी उड्डाण केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन राजीनामा देण्याच्या विचार
नॉर्वेमध्ये नोबेल शांतता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणे, हे माचाडो यांचे मुख्य उद्दिष्ट होते. तथापि, या सीक्रेट ऑपरेशनला विलंब झाल्यामुळे, त्या वेळेवर पुरस्कारासाठी पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी आना कोरिना सोसा हिने त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. समारंभात सोसा यांनी सांगितले की, त्यांची आई लवकरच व्हेनेझुएलाला परत येऊ इच्छिते, कारण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. त्यांनी माचाडोचा संदेश दिला: “स्वातंत्र्य ही अशी गोष्ट नाही ज्याची आपण वाट पाहत असतो, ती अशी गोष्ट आहे जी आपण मिळवतो.”
🚨🇻🇪 🇳🇴 MACHADO LEAVES VENEZUELA, SURFACES IN OSLO TO COLLECT NOBEL PRIZE She spent over a year in hiding. Maduro banned her from leaving Venezuela for a decade. Her daughter had to accept the Nobel Peace Prize on her behalf just hours earlier. Then Maria Corina Machado… pic.twitter.com/B5kER7UaBJ — Mario Nawfal (@MarioNawfal) December 11, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : EU Future : अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी प्लॅन’ची कागदपत्रे लीक! जगाला मोठा धक्का; भारत, चीन, रशियाचा ‘Core-5’ सुपरगट बनवणार?
नॉर्वेहून परतल्यानंतर व्हेनेझुएलाला परत येऊन लोकशाहीसाठीचा लढा सुरू ठेवण्याचा माचाडोने स्वतः निर्धार केला आहे. मात्र, ब्रायन स्टर्न यांनी त्यांना परत न येण्याचा सल्ला दिला आहे. मादुरो सरकारकडून त्यांना अटक होण्याचा मोठा धोका असून, गंभीर कायदेशीर परिणामांना (Serious Legal Consequences) सामोरे जावे लागू शकते. माचाडोचा हा दृढनिश्चय (Determination) त्यांना व्हेनेझुएलाची “आयर्न लेडी” म्हणून प्रस्थापित करतो. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे, व्हेनेझुएलाच्या लोकशाही चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Level) अधिक बळ मिळणार आहे.
Ans: व्हेनेझुएला (Venezuela).
Ans: नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize).
Ans: त्या मादुरो सरकारला विरोधी असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.






