सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला ; भीषण स्फोटामुळे लागली आग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू
बुधवारी (१० डिसेंबर) रात्री उशिरा अचानक बाजारपेठेला मोठी आग लागली (fire Accident). रशियाची सर्वात मोठी बाजारपेठ नेव्हस्की मार्केट अचानक जळून लागले. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे आवाज इतके भयंकर होते की संपूर्ण पीटर्सबर्ग हादरले होते. काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसराला वेढा घातल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पंरुत जोरदार वारे आणि बाजारातील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आगे.
सध्या अग्निशमन दाचलाचे अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. लोकांन सुरक्षित ठिकाणी जाणाचे आणि आगीच्या परिसरापासून दूर राहण्याचे सांगण्यात आले आहे. सध्या या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र बाजापेठेचे मोठे नुकसान झाले आहे.
रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नसून नियोजित हल्ला आहे. अनेकांनी याचा आरोप युक्रेनवर लावला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्या आला आहे. याचा संबंध युक्रेनशी जोडला जात असून यापूर्वी देखील मॉस्कोतील एका कारखान्याला भीषण आग लागली होती. यामध्ये देखील युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचे म्हटले जात होते.
A massive fire has broken out at one of the largest markets in St. Petersburg, Russia, with reports of explosions on site. According to Russian media, the entire market area may be engulfed in flames. Witnesses describe hearing multiple blasts. The cause of the fire remains… pic.twitter.com/TmAsjueTNy — Visegrád 24 (@visegrad24) December 10, 2025
सध्या या आगीमुळे नेव्हस्की मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. हे रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे धोकादायक आहे. नेव्हस्की मार्केट हे रशियाचे सर्वात मोठे घाऊक आणि किरकोळी विक्री केंद्र आहे. या मार्केटमधून दररोज १०० हून अधिक दशलक्ष डॉलर्सची उलाढाल होते. तसेच मध्य आशियाई आणि कॉकेशियन स्थलांतरित व्यापारी या ठिकाणी मोठ्या संख्येने काम करता. या आगीने केवळ सेंट पीटर्सबर्गच नव्हे तप संपूर्ण रशियन फेडरेशनच्या अर्थव्यवस्थेचे प्रंचड नुकसान झाले आहे.
Ans: रशियातील सर्वात मोठी बाजरपेठ सेंट पीटर्सबर्ग येथील नेव्हस्की मार्केटला भीषण आग लागली आहे.
Ans: सेंट पीटर्सबर्ग येथील आगीच्या दुर्घटनेत कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही, परंतु काही लोक जखमी झाले आहेत.
Ans: रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नसून नियोजित हल्ला असल्याचा आणि हा युक्रेनने घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






