फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: इस्त्रायल-हमास युद्ध सुरू होऊन जवळपास एक वर्ष झाली. या युद्धादरम्यान गाझात अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच गाझा पट्टीतील अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. सध्या इस्त्रायल आणि हमास युद्ध काही काळापूर्ते थांबले आहेत. याच वेळी इस्त्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेत्यन्याहू यांनी गाझाला भेट दिली. त्यांनी गाझातील इस्त्रायलच्या लष्करी तळांना भेट दिली आहे.
हमास पुन्हा येणार नाही
यावेळी नेतन्याहूंसोबत संरक्षण मंत्री काट्झ यांनी देखील गाझाला भेट दिली. इस्त्रायलने गाझातील ओलिसींच्या सुटेकेसाठी हे प्रयत्न केले. त्यांनी यासाठी ओलिसांना सोपवणाऱ्या व्यक्तीला 5 दशलक्ष डॉलर्स देखील ऑफर केले. मात्र, नेतन्याहूंनी हमासविरोधात युद्धविरामाचा कोणताही प्रयत्न नाकारला आहे. नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, युद्ध संपल्यानंतर हमास पुन्हा कधीच पॅलेस्टाईववर राज्य करू शकणार नाही. त्यांना पूर्णपण संपुष्टात आणण्यात येईल.
गाझातील बेपत्ता झालेल्या 101 इस्त्रायली ओलिसांचा शोध सुरू
बेजांमिन नेतन्याहू यांनी, हमासला परत येऊ देणार नाही. तसेच इस्त्रायलने गाझातील बेपत्ता झालेल्या 101 इस्त्रायली ओलिसांचा शोध पुन्हा एकदा सुरू केला आहे. नेतन्याहूंनी स्पष्ट केले आहे की, जो काोणी ओलिसांना मारण्याचे, त्यांना दुखापत पोहोचवण्याचे धाडस करेल तो त्याच्या मृत्यूस जबाबदार राहील. आम्ही ओलिसींचा शोध सुरूच ठेवणार आहे.
इस्त्रायली लष्कराने या भेटीचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू युद्ध डॅकेट आणि हेल्मेट घालून दिसत आहेत. इस्त्रायल G-20 परिषदेचा भाग नाही. याच दरम्यान एकीकडे ही परिषदत सुरू असताना इस्त्रायलने गाझाला भेट दिली. शिखर परिषदेत गाझाला मानतावादी मदत पोहचवण्यालर आणि युद्धबंदीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्रायल-हमास युद्धाला 13 महिने पूर्ण
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल हमास युद्धाला 13 महिने पूर्ण झाले असून यामध्ये गाझाचे 90% नुकसान झाले आहे. या युद्धाची सुरूवात 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती. हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीतून इस्त्रायलमध्ये घुसले होते. त्यांनी इस्त्रायलवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 1139 लोकांची हत्या केली आणि 251 लोकांचे अपहरण करण्यात आले होते. या गोळीबारानंतर काही तासांतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. या युद्धात आत्तापर्यंत गाझातील 44 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. आता इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेले युद्ध लेबनॉन आणि इराणपर्यंत पोहोचले आहे.
गाझातील परिस्थिची बिकट
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गाझातील अनेक लोकांपर्यंत मानतवादी मदत अजूनही पोहोचू शकलेली नाही. अनेक लोकांना अन्न मिळणे कठीण झाले असून आत्तपर्यंत 50,000 बालके तीव्र कुपोषणाचे बळी झाले आहेत. गाझातील आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली आहे. या अहवालानुसार, आत्तापर्यत इस्रायलने 7 ऑक्टोबरपासून पॅलेस्टिनींवर 1,000 हून अधिक हल्ले केले आहेत.