संयुक्त राष्ट्र परिषदेतील भारताचे स्थायी प्रतिनीधी, राजदूत पार्वतानेनी हरीश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
न्यूयॉर्क : गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे. गाझामध्ये अनेक अमानवीय कृत्य घडत आहे. इस्रायलच्या कारवायांमुळे गाझातील पॅलेस्टिनी लोकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान या युद्धावर भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNSC) आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या या विधानेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. भारताने गाझातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेतील भारताचे स्थायी प्रतिनीधी, राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी न्यूयॉर्कच्या परिषदेत महत्वपूर्ण विधान केले आहे. भारताने गाझातील पॅलेस्टाईन लोकांच्या परिस्थितीवर भारताची ठाम भूमिका मांडली आहे. भारताने चिंता व्यक्त करत तात्काळ युद्धबंदीची मागणी तेली आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेकडे भारताने गाझातील मानवतावादी संकट थांबवण्याचे आणि तात्काळ युद्धबंदी लागू करण्याचे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच ओलिसांची सुटका करण्याचे आणि लोकांपर्यंत सुरक्षित मदत पोहचवण्याचेही आवाहन केले आहे. याशिवाय भारताने इस्रायल आणि हमास युद्धावर राजनैतिक मार्गाने कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे म्हटले आहे.
भारताने मानवतावादी मदतीवर सातत्याने भर दिला आहे. भारताने आपर्यंत यावर गाझाला अनेकवेळा सहकार्य केले आहे. सध्या सुरु असलेल्या संकटाला संपवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच बारताने मध्य पूर्व देशांकडून येणाऱ्या मदतीच्या महत्वावरही भर दिला आहे.
#WATCH | New York: India’s Permanent Representative to the United Nations, Ambassador Harish P., delivered India’s statement at the UN Security Council Quarterly Open Debate on the Situation in the Middle East, including the Palestinian question.
He said, “… The way ahead is… pic.twitter.com/nGS5Fd8jhQ
— ANI (@ANI) July 24, 2025
भारताने मध्य पूर्वेतील सुरु असलेल्या युद्धावर राजनैतिक मार्गाने कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो असे म्हटले आहे. यासाठी प्रथम तात्काळ युद्धबंदी आणि नंतर शांतता चर्चेचे आवाहन भारताने केले आहे. तसेच ओलिस ठेवण्यात आलेल्या कैद्यांची सुटका देखील करणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.
यासाठी शांतता चर्चेच्या माध्यमातून आणि राजनैकि प्रयत्नातून प्रभावी मार्ग काढण्याचे भारताने म्हटले आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य देखील भारताने अधोरेखित केले आहे. तसेच भारत नेहमीच समान संधी तत्वांवर विश्वास ठेवणारे देश असल्याचे आणि या धोरणाशी वचनबद्ध असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, गाझामध्ये सध्या मानवतावादी संकटात वाढण्याची शक्यता आहे. गाझातील ९५ टक्के रुग्णालये संघर्षात उद्ध्वस्त झाली आहे. तसेच युद्धामुळे जवळपास ६.५ लाखांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.