फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सियोल: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग याने दक्षिण कोरियावर जीपीएस जॅमिंग हल्ला केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे आधुनिक तंत्रज्ञान काय आहे. तर हा आधुनिक काळातील एक धोकादायक तंत्रज्ञान-आधारित हल्ला मानला जात आहे. जीपीएस जॅमिंग हल्ल्याचा मुख्य उद्देश म्हणजे जीपीएस प्रणालीतील सिग्नलमध्ये अडचण आणणे आहे. परिणामी, यामुळे अनेक लष्करी आणि नागरी विमानांची नेव्हिगेशन प्रणाली विस्कळीत होते आणि विमाने त्यांच्या निश्चित मार्गावरून चुकू शकतात व त्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढते.
GPS प्रणाली- जगभरातील नेव्हिगेशन सुरळित चालते
GPS प्रणाली ही उपग्रहांद्वारे जगभरातील नेव्हिगेशनसाठी वापरली जाते. जीपीएसमुळे वाहने, जहाजे, आणि विमाने योग्य मार्गाने प्रवास करू शकतात. परंतु जीपीएस जॅमिंगमध्ये, हल्लेखोर रेडिओ संप्रेषणात अडथळा आणण्यासाठी अधिक तीव्र सिग्नल प्रसारित करतात. यामुळे योग्य जीपीएस सिग्नल मिळत नाहीत. यामुळे विमानांच्या नेव्हिगेशन प्रणालीवर गंभीर परिणाम होतो आणि ते चुकून धोकादायक ठिकाणी पोहोचू शकतात.
दक्षिण कोरियाच्या केसोंग आणि हेजू या सीमावर्ती भागात हल्ले
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने काल हे हल्ले केसोंग आणि हेजू या सीमावर्ती शहरांजवळ जीपीएस जॅमिंग हल्ले सुरू केले आहेत. यामुळे दक्षिण कोरियाच्या डझनभर नागरी विमानांची व जहाजांची नेव्हिगेशन प्रणाली बाधित झाली आहे. तसेच सुद्रात देखील अनेक जहाजांवर परिणाम झाला आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने हल्ल्यानंतर आपल्या पश्चिम सीमावर्ती भागात विमाने आणि जहाजांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच, GPS जॅमिंगशिवाय स्पूफिंग तंत्राचा वापरही केला जातो. मात्र दक्षिण कोरियाच्या लष्करी ऑपरेशन आणि उपकरणांवर कोणताही परिणाम झाले नसल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
तंत्रज्ञान-आधारित हल्ले आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन
यामध्ये खोटे GPS सिग्नल प्रसारित करून शत्रूची विमाने व ड्रोन चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला जातो, यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला ताबडतोब जॅमिंग हल्ला थांबवण्याचे आवाहन केले असून, भविष्यातील कोणत्याही अनिष्ट घटनेसाठी उत्तर कोरिया जबाबदार असेल असा इशाराही दिला आहे. हे तंत्रज्ञान-आधारित हल्ले आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून, यामुळे केवळ विमानांच्या सुरक्षेला धोका नाही तर हजारो प्रवाशांचे जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतात.
हे देखील वाचा- बलुचिस्तानमध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघाती विस्फोट; 21 ठार तर 30 जखमी