सावधान! २०४९ पर्यंत अरुणाचल गिळंकृत करण्याचा चीनचा कट; अमेरिकेचा भारताला मोठा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pentagon report on China’s Greater China vision 2049 : जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी संस्था असलेल्या अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने पेंटागॉन (Pentagon) चीनच्या (china) वाढत्या महत्त्वाकांक्षेबाबत एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २०४९ सालापर्यंत ‘ग्रेटर चायना’ निर्माण करण्याचे स्वप्न पाहत असून, यामध्ये भारताच्या अरुणाचल प्रदेशाचा समावेश करण्यात आला आहे. चीनने आता अरुणाचलला आपल्या अशा ‘मुख्य हितसंबंधांच्या’ (Core Interests) यादीत टाकले आहे, ज्यावर ते जगातील कोणत्याही शक्तीसोबत तडजोड करण्यास तयार नाहीत.
पेंटागॉनने अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, चीनचा असा विश्वास आहे की जोपर्यंत ते भारताचा ईशान्येकडील भाग (अरुणाचल), तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि जपानची सेनकाकू बेटे स्वतःच्या नियंत्रणाखाली आणत नाहीत, तोपर्यंत त्यांचा ‘महान चीन’ पूर्ण होणार नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) आपल्या या विस्तारवादी धोरणाला ‘राष्ट्रीय पुनरुज्जीवन’ असे नाव दिले असून, यासाठी ते लष्करी सामर्थ्य वापरण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप
अहवालानुसार, चीनने तीन अशा क्षेत्रांची निवड केली आहे ज्यावर ते कोणत्याही परिस्थितीत वाटाघाटी करणार नाहीत. यामध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अखंड नियंत्रण, देशाचा आर्थिक विकास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या प्रादेशिक दाव्यांचा विस्तार यांचा समावेश आहे. चीन हाँगकाँग, शिनजियांग, तिबेट आणि तैवानमधील लोकशाहीवादी आवाजांना ‘फुटीरतावादी’ ठरवून ते परकीय शक्तींच्या चिथावणीवरून होत असल्याचा बनाव रचत आहे. अरुणाचल प्रदेशला देखील चीन ‘दक्षिण तिबेट’ संबोधून त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे भारताच्या सार्वभौमत्वाला मोठे आव्हान आहे.
The @DeptofWar’s new #China #Military Power Report focuses on concisely reviewing new #PLA & related developments (rather than rehashing previous years’s analysis or providing general background). The 2025 edition (25th in the series) has some of the most extensive & informative… pic.twitter.com/xDzjH5NdJj — Andrew Erickson 艾立信 (@AndrewSErickson) December 24, 2025
credit : social media and Twitter
ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत आणि चीन दरम्यान एलएसीवरील संघर्ष बिंदूंवरून सैन्य मागे घेण्याबाबत महत्त्वपूर्ण करार झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची रशियातील ब्रिक्स शिखर परिषदेत भेटही झाली. मात्र, पेंटागॉनच्या मते, चीनने दाखवलेला हा मवाळपणा केवळ एक तात्पुरती चाल आहे. चीनला भीती आहे की भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ झाल्यास त्यांच्या ‘ग्रेटर चायना’ स्वप्नात अडथळे येतील. म्हणूनच, भारताला अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी चीन सध्या सीमेवर शांततेचे नाटक करत असण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण
पेंटागॉनचा अहवाल स्पष्ट करतो की, भारत आणि चीन यांच्यातील परस्पर अविश्वास इतका खोल आहे की, दीर्घकालीन सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा निघणे सध्या तरी अशक्य वाटते. भारत चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करत आहे. चीनच्या २०४९ च्या या प्लॅनने केवळ भारताचीच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियातील देशांची चिंता वाढवली आहे.
Ans: २०४९ पर्यंत तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशासह सर्व विवादित क्षेत्रांवर पूर्ण नियंत्रण मिळवून एक शक्तिशाली चिनी राष्ट्र निर्माण करणे हे या प्लॅनचे उद्दिष्ट आहे.
Ans: चीनने अरुणाचल प्रदेशला आपल्या 'मुख्य हितसंबंधांमध्ये' (Core Interests) समाविष्ट केले असून त्यावर कोणताही करार किंवा वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे.
Ans: पेंटागॉनच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध अधिक खोलवर जाण्यापासून रोखण्यासाठी चीनने सध्या सीमेवर मवाळ भूमिका घेतली आहे.






