Pahalgam Terror Attack : मुनीरसोबत 'या' दोन ISI अधिकाऱ्यांनी रचला पहलगामचा कट; पाकिस्तानी पत्रकाराने केला खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pahalgam Terror Attack news marathi : इस्लामाबाद: एप्रिल २०२५ मध्ये भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. दरम्यान या हल्ल्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख व फील्ड मार्श यांचा हात असल्याचे म्हटले जाते. याच वेळी पाकिस्तानच्या पत्रकाराने आणकी एक मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात असीम मुनीरसह दोन आयएसआय अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे म्हटले आहे. आयएसआय ही पाकिस्तानती गुप्तचर संस्था आहे. या संस्थेवर अनेकवेळा भारतात दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आदिल राजा यांनी आणखी एक मोठा खुलासा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परंतु अद्याप पाकिस्तान सरकराने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आदिल राजा एक पाकिस्तानी शोध पत्रकार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचा तो मानला जातो. आदिल राजा सोल्जर्स स्पीद्वारे संपर्क करतो. सध्या पत्रकार आदिल राजा लंडनमध्ये राहत आहेत. या पत्रकाराने पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर राजा यांनी असीम मुनीरने लष्कर-ए-तैयबाला या हल्ल्यात मदत केल्याचे म्हटले आहे. याच विधानाच्या एकदिवसानंतचर, द रेसिडेंट फ्रंड संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. रेसिडेंट फ्रंडचे पाकिस्तानशी संबंध असलेले देखील आदिल राजाने उघडल केले होते.
दरम्यान पत्रकार आदिल राजाने पु्न्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आदिल राजाने दिलेल्या माहितीनुसार, पहलगामवर हल्ला करण्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला देण्यता आली होती. मोहम्मद हारुन मुर्तझा आणि अहमद आरिफिन यांना लष्कराला सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले होते. आरिफिन हा पाकिस्तानी सैन्यामध्ये ड्रोन आधारित ऑपरेशन्सचे कामकाज पाहतो. मुर्तझा एका उच्च पदावर आहे. या दोन अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह पैसे देखील पुरवल्याचा आरोप आहे.
पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकिस्तान सैन्याचा होता असे म्हटले जाते. मुसाने इतर दहशतवाद्यांसह मिळून बैसरखान खोऱ्यात २६ लोकांची हत्या केली होती. तसेच पीओकेमध्ये देखील हल्ल्याचा कट रचला होती. या हल्ल्यानंतर भारताच्या पंजाव आणि उत्तर प्रदेशातून एका आयएसआय एजंटला देऱील पकडण्यात आले होते. सध्या भारत पहलगाम हल्ल्याचा अजूनही तपास करत आहे. यामध्ये अद्याप अनेत गोष्टी गूढ आहेत.






