पाकिस्तानी दावे फोल! 'Operation Sindoor'दरम्यान पाक नौदलाने केले 'असे' होते पलायन, पहा Satellite images ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Navy retreat Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या नौदलाची खरी कहाणी अखेर जगासमोर आली आहे. आजवर पाकिस्तानने जगासमोर “भारतीय हल्ल्यांना आम्ही तडाखेदार प्रत्युत्तर दिले” अशी छबी रंगवली होती. पण प्रत्यक्षात सत्य काही आणिच होते. उपग्रह प्रतिमांमधून हे स्पष्ट झाले आहे की, भारताच्या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे नौदल कराचीतून अक्षरशः पळ काढून गेले होते.
इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या या उपग्रह प्रतिमांतून दिसून येते की, ६-७ मेच्या रात्री भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी युद्धनौका त्यांच्या मूळ तळावरून गायब झाल्या होत्या. या ऐवजी त्या व्यावसायिक कार्गो बंदरात लपवून ठेवल्या गेल्या होत्या. काही युद्धनौका तर थेट इराणी सीमेजवळ हलवण्यात आल्या होत्या.
१९७१ च्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला प्रचंड विध्वंस पाकिस्तानला आजही विसरता आलेला नाही. तेव्हाच कराची बंदर सलग काही दिवस जळत राहिले होते. त्याच आठवणीमुळे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानला भीती वाटत होती की, भारत पुन्हा कराचीवर हल्ला करू शकतो. त्यामुळे कराची नौदल तळावरील प्रमुख युद्धनौका रातोरात हटवून ग्वादरकडे वळवण्यात आल्या. उपग्रह प्रतिमांनुसार, कराचीच्या व्यावसायिक कार्गो टर्मिनलमध्ये तीन युद्धनौका एकत्र उभ्या दिसल्या, तर दुसऱ्या टर्मिनलमध्ये आणखी एक युद्धनौका वेगळी ठेवण्यात आली. हा सगळा प्रकार पाकिस्तानच्या भीतीचा पुरावा देतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय नौदलाने संपूर्ण अरबी समुद्र आपल्याकडे घट्ट पकडून ठेवला होता. भारताचे विमानवाहू जहाज आणि संपूर्ण ताफा पाकिस्तानवर निर्णायक हल्ल्यास सज्ज होते. मात्र, भारताने तसा प्रत्यक्ष हल्ला न करता आपली सामरिक ताकद दाखवून पाकिस्तानला पुरते घाबरवले.
पाकिस्तान गेल्या काही आठवड्यांपासून “आम्ही भारताला तितक्याच जोरदार प्रत्युत्तर दिले” असे सांगत होते. पण सॅटेलाइट प्रतिमांनी पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरवला आहे. सत्य हे आहे की, भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी नौदलाने कराची सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, १९७१ प्रमाणेच आजही भारतीय नौदल पाकिस्तानला शरण जाण्यास भाग पाडू शकते. ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानच्या रणनीतीची कमजोरी उघड केली नाही, तर भारताच्या नौदलशक्तीचा दबदबा पुन्हा अधोरेखित केला आहे.