Pak Navy Ship Blast : शाहबाज-मुनीरला मोठा झटका! अरब समुद्रात पाकिस्तान नौदलाच्या जहाजावर थेट हल्ला, जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, अरब समुद्रात जिवानी खालीजवळ पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे ३ जवान ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्वादर बंदरादजवळ हा भीषण स्फोट झाला आहे. बलूचिस्तान पोस्टने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या स्फोटात जहाजेचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. हे पाकिस्तानी लष्कराला थेट आव्हान मानले जात आहे. मात्र अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
या हल्ल्यामुळे मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आधाची पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तहरीक-ए-पाकिस्तान (टीटीपी) यांसारख्या संघटनांशी झुंज देत आहे. याशिवाय सीमेवर अफगाणिस्तानशीही युद्ध सुरु आहे. अशा परिस्थिती नौदलावर हल्ल्याने पाकिस्तान संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
पाकिस्तान बलूचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सशस्त्र संघर्ष सुरु आहे. बलूचिस्तानमधील विद्रोही गटांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर त्यांच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करत आहे. त्यांच्या संपत्तीचा वापर पंजाब आणि सिंध प्रांताच्या विकासासाठी केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे इराण अमेरिका तणावामुळे होर्मुझ वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझ पुन्हा बंद करत पाकिस्तानच्या दोन जहाजांना पुन्हा माघारी जावे लागले आहे. यामुळे पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे.
Major escalation in Arabian Sea. A Pakistani naval vessel was targeted near Jiwani Bay earlier today , resulting in the deaths of at least 3 personnel. This is a significant development, as it is the first time Pakistani forces have been targeted at sea within Balochistan. pic.twitter.com/LFH5eLS7SN — The Balochistan Post – English (@TBPEnglish) April 12, 2026






