नवी दिल्ली – आर्थिक परिस्थितीशी झुंज देत असलेल्या पाकिस्तानला आपल्या सहकारी देशाकडून २४ हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत येत्या दोन आठवड्यात मिळेल, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी जिओ न्यूजला दिलेल्या मुखाखतीत सांगितले.
दरम्यान, परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला जात आहे. पाकिस्तानला १२ महिन्यांत विदेशी कर्जाची परतफेड करावी लागेल. विदेशी आणि जुने कर्ज मिळून पाकिस्तानला एका वर्षभरात एकूण २१ लाख कोटी रुपयांची परतफेड करावी लागणार आहे.
वृत्तसंस्थेला बोलताना अर्थमंत्री दार म्हणाले की, पाकिस्तानची परकीय गंगाजळी ६१,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी भागीदार देशाच्या मदतीने २४,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल. मात्र, दार यांनी भागीदार देशाचे नाव सांगितले नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांनी देखील आपल्या IMFवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आएमएफवर कर्जाचा आढावा घेण्यास विलंब केल्याचा आरोप लावला.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही आढावा घेण्यास विलंब होत आहे. त्याला काही अर्थ नाही, असे अर्थमंत्री दार मुलाखतीत म्हणाले. आता त्याला काही फरक पडत नाही, आम्हाला आएमएफकडे भीक मागायची नाही, असेही ते म्हणाले. खरे तर दिवाळखोर घोषित झाल्यानंतर पाकिस्तानला आयएमएफकडून ४८ हजार कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज देण्यात आले होते. त्यात यावर्षी ८ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.