पाकिस्तानचा फसवा प्रचार उजेडात : शाहबाज शरीफ यांनी दिलेला फोटो निघाला चीनच्या रॉकेट फोर्सचा! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Fake Propaganda : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील जबरदस्त विजयानंतर पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी नेतृत्वाकडून खोट्या माहितीचा प्रचार करण्याचे सत्र सुरू आहे. अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना दिलेले एक छायाचित्र वादग्रस्त ठरले आहे. हा फोटो भारतावर झालेल्या तथाकथित तोफखाना हल्ल्याचे प्रतीक म्हणून देण्यात आला होता. मात्र, सत्य उघड होताच लक्षात आले की हे छायाचित्र चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या रॉकेट फोर्सचे आहे!
शाहबाज शरीफ यांनी असीम मुनीर यांना फील्ड मार्शलपद देताना सन्मानादाखल एक छायाचित्र भेट दिले. या चित्रात अनेक रॉकेट लाँचर प्रणाली एकाच वेळी गोळीबार करताना दिसत होत्या. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे ढग यामुळे हे दृश्य युद्धाच्या एखाद्या थरारक क्षणाचे वाटते. पाकिस्तानने या फोटोसह दावा केला की हे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतावर झालेल्या तोफखाना हल्ल्याचे दृश्य आहे. पण सत्य वेगळेच निघाले.
स्वतंत्र मीडिया संस्थांनी जेव्हा या फोटोची तथ्य तपासणी केली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. हे चित्र पाकिस्तानच्या सैन्याचे नव्हे, तर २०१९ मध्ये चीनने आयोजित केलेल्या युद्धसरावामधील आहे. हे छायाचित्र पीएलए रॉकेट फोर्सच्या अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध असून, ते चिनी लष्कराच्या क्षमतेचे उदाहरण म्हणून वापरले जाते. या खुलास्यानंतर पाकिस्तानातील अनेक माध्यमांनी आणि नागरिकांनीच पंतप्रधानांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवर “हेच तुमचं प्रत्यक्षातलं यश?” अशा शब्दांत पाकिस्तान सरकारवर टीका केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-गाझा युद्धात नरसंहाराची परिसीमा; बालवाडी शाळेवर हल्ला, 25 जण जिवंत जळाले; गाझातील 70% इमारती उद्ध्वस्त
हे प्रकरण पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा काही नवीन नमुना नाही. याआधीही, ऑपरेशन सिंदूरच्या त्वरित नंतर परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानच्या संसदेत एक इंग्लंडमधील बातमीपत्राचे क्लिपिंग दाखवून दावा केला की भारतीय हवाई दलाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सत्य असे होते की हे क्लिपिंग फोटोशॉप करून बनवलेले होते. आणि हे उघड करणारेही पाकिस्तानातीलच एक स्थानिक वृत्तपत्र होते!
🚨Pakistan never disappoints in the comedy department
Pakistani PM gifts Asim Munir a photoshopped pic from a 2019 Chinese drill, calling it ‘Operation Bunyan Al Marsus’.
Gazab Ch@tiya Kaum h BC! pic.twitter.com/gFFklV6LVK
— Space Recorder (@1spacerecorder) May 25, 2025
credit : social media
असाच प्रकार पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या बाबतीतही घडला. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी भारताच्या लढाऊ विमानांविरोधात अपप्रचार करताना सोशल मीडियावरील बनावट फोटो आणि माहितीचा आधार घेतला. युद्धात पराभव झाल्यानंतर त्यांचा राग आणि निराशा थेट खोट्या माहितीच्या प्रसारात व्यक्त होत असल्याचे यातून दिसते.
या घटनांवरून स्पष्ट होते की, पाकिस्तान आता आपल्या पराभवावर झाक घालण्यासाठी खोट्या गोष्टी रचण्याचे धोरण अवलंबत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानचे १३ लष्करी तळ उद्ध्वस्त केले, यामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. आता या पराभवावर झाक घालण्यासाठी, खोट्या फोटो, बनावट बातम्या, आणि चुकीच्या दाव्यांचा सुळसुळाट केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘What the hell…’ रशियाच्या युक्रेनवरील भीषण हवाई हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प चवताळले
शाहबाज शरीफ यांच्याकडून असीम मुनीर यांना भेट म्हणून दिलेला चिनी फोटो ही पाकिस्तानच्या खोटारडेपणाची आणखी एक नमुना ठरतो. ही घटना केवळ हास्यास्पदच नाही, तर पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय संस्थांचा खोट्या प्रचारावर असलेला विश्वास दाखवणारी धोकादायक बाब आहे. जागतिक स्तरावर विश्वासार्हता गमावणाऱ्या पाकिस्तानला या प्रकारांमुळे आणखी विश्वासहीनतेला सामोरे जावे लागणार आहे.