• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Project Pelican Isi Khalistani Plot Against India Exposed

‘Project Pelican’मुळे खळबळ; भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक, ISI आणि ड्रग्ज नेटवर्कचा भयंकर कट उघड

Project Pelican : भारताविरोधात रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करताना कॅनडातील पील प्रादेशिक पोलिसांनी "प्रोजेक्ट पेलिकन" अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 12, 2025 | 09:13 AM
Project Pelican ISI-Khalistani plot against India exposed

'Project Pelican'मुळे खळबळ! भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक आणि ISI चा आणखी एक धोकादायक कट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Project Pelican : भारताविरोधात रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करताना कॅनडातील पील प्रादेशिक पोलिसांनी “प्रोजेक्ट पेलिकन” अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक भव्य ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्क उघडकीस आले असून, त्याचे संपर्क खलिस्तानी समर्थक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि मेक्सिकन ड्रग्ज कार्टेल यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या नेटवर्कमधून ड्रग्ज विक्रीतून मिळालेले पैसे भारताविरोधी कारवायांमध्ये वापरले जात असल्याचेही उघड झाले आहे.

अमेरिका-कॅनडा ट्रकिंग मार्गातून कोकेनची मोठ्या प्रमाणात तस्करी

या तपासाची सुरुवात जून २०२४ मध्ये झाली होती. संशयित टोळी व्यावसायिक ट्रकिंग मार्गांचा वापर करून अमेरिका ते कॅनडा कोकेनची तस्करी करत होती. नोव्हेंबर २०२४ पर्यंत या टोळीतील ट्रक कंपन्या, गोदामे आणि संशयित व्यक्तींची ओळख पटली होती. कॅनडाच्या CBSA (Canada Border Services Agency) आणि अमेरिकेच्या DEA (Drug Enforcement Administration) यांच्या सहकार्याने ही कारवाई व्यापक स्वरूपात पार पडली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीच्या गाभ्यातून बाहेर येत आहेत मौल्यवान धातू; ज्वालामुखीच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना सापडले आश्चर्यकारक पुरावे

इतिहासातील सर्वात मोठी ड्रग्ज जप्ती : ४७९ किलो कोकेन हस्तगत

फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी छापे टाकून ४७९ किलो ब्रिक्ड कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य जवळपास $४७.९ दशलक्ष (४०० कोटी रुपये) आहे.

प्रमुख जप्त्या पुढीलप्रमाणे:

१२७ किलो कोकेन विंडसरमधील Ambassador Bridge येथे

५० किलो कोकेन पॉइंट एडवर्डमधील Blue Water Bridge येथे

तसेच, ग्रेटर टोरंटो एरियामधील इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जप्ती

याशिवाय, दोन बेकायदेशीर सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलं देखील जप्त करण्यात आली आहेत.

९ आरोपी अटकेत, ७ जण भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक

पील पोलिसांनी या प्रकरणात ९ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७ जण भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:

1. सज्जित योगेंद्रराजा (३१, टोरंटो)

2. मनप्रीत सिंग (४४, ब्रॅम्प्टन)

3. फिलिप टेप (३९, हॅमिल्टन)

4. अरविंदर पवार (२९, ब्रॅम्प्टन)

5. करमजित सिंग (३६, कॅल्डन)

6. गुरतेज सिंग (३६, कॅल्डन)

7. सरताज सिंग (२७, केंब्रिज)

8. शिव ओंकार सिंग (३१, जॉर्जटाउन)

9. हाओ टॉमी हू (२७, मिसिसॉगा)

या सर्वांविरुद्ध ड्रग्ज तस्करी, शस्त्रास्त्र कायद्यातील उल्लंघन आदी ३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ब्रॅम्प्टनमधील ओंटारियो कोर्ट ऑफ जस्टिस येथे त्यांच्यावर सुनावणी होणार आहे.

ISI आणि खलिस्तान लिंक स्पष्ट; भारतविरोधी कारवायांसाठी फंडिंग

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, या नेटवर्कला पाकिस्तानच्या ISI कडून समर्थन मिळत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. ISI ने खलिस्तानी समर्थकांचा वापर करून कोकेन तस्करीची साखळी निर्माण केली होती. एवढेच नाही तर, अफगाणिस्तानातून येणारे हेरॉइनही ISI कडून पसरवले जात होते, आणि यातून मिळालेली रक्कम भारताविरोधातील निदर्शने, जनमत चाचण्या, शस्त्रास्त्र खरेदी आणि खलिस्तानी चळवळीच्या प्रचारासाठी वापरली जात होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू जल करारानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी; हिंदू कुश हिमालयातील 75% हिमनद्या धोक्यात

पूर्वीच्या प्रकरणांचीही जोड उघड

डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय राज्यात १,००० पौंड कोकेनसह दोन भारतीय वंशीय कॅनेडियन नागरिक अटक करण्यात आली होती. त्याच प्रकरणातून पुढे ‘प्रोजेक्ट पेलिकन’ चा उगम झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ओंटारियोचे सॉलिसिटर जनरल मायकेल एस. केर्झनर यांनी या कारवाईचं कौतुक करताना म्हटलं, “प्रोजेक्ट पेलिकन हे दाखवून देतो की पोलिसांना योग्य संसाधनं दिल्यास ते समाजाच्या सुरक्षेसाठी किती निर्णायक भूमिका बजावू शकतात.”

Project Pelican

‘प्रोजेक्ट पेलिकन’ ही केवळ ड्रग्ज तस्करीविरोधातली कारवाई नसून, ती भारताच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका घातक आंतरराष्ट्रीय कटाला उघड करणारी ठरली आहे. या प्रकरणामुळे खलिस्तानी चळवळीमागे असलेला ISIचा हात पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. तसेच, भारताविरुद्ध सुरू असलेल्या छुप्या युद्धाच्या पद्धती, त्यामागची आर्थिक यंत्रणा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांची झलकही समोर आली आहे.

Web Title: Project pelican isi khalistani plot against india exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • drugs smuggling
  • international news

संबंधित बातम्या

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
1

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज
2

ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज

अल्बानियामध्ये अडकलेल्या उमेश धोडी यांना मायदेशी परत आणा! हेमंत सवरांचे परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन
3

अल्बानियामध्ये अडकलेल्या उमेश धोडी यांना मायदेशी परत आणा! हेमंत सवरांचे परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन

Gold Mines:  खजाना सापडला खजाना…! जमिनीच्या अवघ्या ५९ फुट खाली सोने, तांब्याचे साठ, जाणून घ्या कुठे आहे हा मोठा खजिना
4

Gold Mines: खजाना सापडला खजाना…! जमिनीच्या अवघ्या ५९ फुट खाली सोने, तांब्याचे साठ, जाणून घ्या कुठे आहे हा मोठा खजिना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चिमुकल्यांना संकटात पाहताच डाॅगेश भाऊने फुल हिरो स्टाईलमध्ये घेतली एंट्री, बाल्कनीतून उडी मारली अन्… मजेदार Video Viral

चिमुकल्यांना संकटात पाहताच डाॅगेश भाऊने फुल हिरो स्टाईलमध्ये घेतली एंट्री, बाल्कनीतून उडी मारली अन्… मजेदार Video Viral

Top Marathi News Today Live Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

LIVE
Top Marathi News Today Live Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यामनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले तीन बदल! वाचा सविस्तर

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यामनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले तीन बदल! वाचा सविस्तर

Zodiac Sign: गजलक्ष्मी योगाचा अनोखा संयोग, कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Zodiac Sign: गजलक्ष्मी योगाचा अनोखा संयोग, कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

लघवीला सतत वास येतो? शरीरासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका,दुर्लक्ष केल्यास दिसतील भयंकर परिणाम

लघवीला सतत वास येतो? शरीरासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका,दुर्लक्ष केल्यास दिसतील भयंकर परिणाम

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

Dharashiv crime: धाराशिव हादरला! जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या

Dharashiv crime: धाराशिव हादरला! जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.