महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘मी एका कॉलवर युद्ध थांबवेन…’ ; Thailand Cambodia संघर्षावर ट्रम्पचा मोठा दावा
नुकतेच मंगळवारी (०९ डिसेंबर) पेनसिल्व्हेनियात झालेल्या एका कॅसिनो रॅलीचे आयोजन ट्रम्प यांनी केले होते. या रॅलीत ट्रम्प यांना महागाईपासून सुटका करतील यावर घोषणा करतील अशा अपेक्षा लोकांना होती. मात्र ट्रम्प यांनी त्यांचे जुने दावेच पुन्हा केले. पेट्रोलच्या कीम किमती आणि देशातील वाढती गुंतवणूक, आणि नोकऱ्या यांवर दावे केले. पंरुत त्यांना महागाईवर तोडगा काढण्यावर कोणताही ठोस उपाय दिला नाही.
शिवाय रॅलीमध्ये त्यांनी केवळ डेमोक्रॅट्स आणि बायडेन प्रशासनावर टीका केली. तसेच ट्रान्सजेंडर स्पोर्ट, इमिग्रेशन यावर मत मांडले. याशिवाय ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर इमिग्रेशन धोरणावर टीका केली. त्यांच्यामुळेच स्थलांतरितांनी देशात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी बायडेनवर केला.
मात्र यामुळे जनतेमध्ये रोष वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे त्यांच्या रेटिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घटन झाली आहे. सध्या ट्रम्प यांची अप्रूवल रेटिंग ही ४४% वर अडकली आहे. रिपब्लिकन पक्षातही सध्या यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कॉंग्रेस सदस्य टोनी गोंझालेस यांनी देखील ट्रम्प देशांतर्गत आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.
सध्या ट्रम्प यांच्या देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्षपणामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष वाढला आहे. विशेषता अमेरिकेत दैनंदिन जीवनातील वस्तू महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच घरांच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे लोक ट्रम्पवर नाराज आहे.
सध्या ट्रम्पवरील नाराजीचा फायदा विरोधी नेत्यांना होत आहे. अमेरिकेत अंतर्गत निवडणूका सुरु असून महागाई, इमिग्रेशन या धोरणाला मुद्दा बनवला जात आहे. नुकतेच अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये मेयरपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी निवडून आले होते. ते ट्रम्पचे कट्टर विरोधक मानले जातात आणि त्यांनी देखील महागाई आणि इमिग्रेशन ला मुद्दा बनवून निवडणूक ळडवली होती.
Ans: अमेरिकेत गेल्या काही काळात महागाई प्रचंड वाढली आहे. घरांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तसेच रोजनच्या दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू देखील महाग झाल्या आह. शिवाय लोकांच्या मते, ट्रम्प यावर कोणताही ठोस तोडगा काढत नसून केवल बाहेरच्या देशांवर टॅरिफ लावण्यात व्यस्त आहेत. यामुळे लोकांचा ट्रम्पवरील रोष वाढत आहे.
Ans: सध्या ट्रम्प यांची Approval Rating ४४% वर अडकली आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे.






