कतारच्या अमीरचे राष्ट्रपती भवनात स्वागत; 'गार्ड ऑफ ऑनर' ने करण्यात आले सन्मानित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या निमंत्रणावरुन कतरचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी आज भारताला भेट दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून स्वत: शेख तमीम यांचे एयरपोर्टवर स्वागत केले. सध्या ते दिल्लीतील हैद्राबादच्या राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत उपस्थितीत आहेत. या दरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनर सन्मानित करण्यात आले.
यावेळी कतरचे अमीर आणि पंतप्रधान मोदी यांच्यात हैदराबाद हाउस मध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, ऊर्जा आणि सामरिक सहकार्यावर भर देण्यात आला. कतरच्या अमीराची ही भारत भेट दोन्ही देशांच्या संबंधांना मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
Went to the airport to welcome my brother, Amir of Qatar H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani. Wishing him a fruitful stay in India and looking forward to our meeting tomorrow.@TamimBinHamad pic.twitter.com/seReF2N26V
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2025
भारत आणि कतारमधील करार
या दरम्यान भारत आणि कतर यांच्यात दोन महत्त्वाचे MOU करार करण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि कतरचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी यांच्यासह या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हे MOU भारत आणि कतर यांच्यातील जॉइंट ट्रेड फोरमच्या स्थापनेसाठी आहे.
कतर भारतासाठी महत्त्वाचा का
भारतासाठी कतर हा एक महत्त्वाचा उर्जा भागीदार असून कतर भारताच्या उर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारताला कतरकडून सर्वाधिक LNG व LPG चा पुरवठा केला जातो. दोन्ही देशांत व्यापारातील तफावत वाढली आहे. भारताचा कतरसोबत 10.64 अब्ज डॉलरचा व्यापार तुटवडा आहे. तथापि, कतर भारताच्या व्यवसायिक, औद्योगिक आणि श्रमिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून काम करत आहे.
शेख तमीम यांचे जीवन
शेख तमीम अल-थानी, कतरचे 11वे अमीर आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1980 रोजी झाला असून ते कतरचे माजी अमीर हमद बिन खलीफा यांचे चौथे पुत्र आहेत. त्यांचे शिक्षण ब्रिटनमधून झाले आहे. तसेच त्यांनी 1998 मध्ये कतर आर्मीचे नेतृत्व केले आहे. नंतर त्यांनी 2013 मध्ये कतरचे अमीर म्हणून शपथ घेतली आणि त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांना जगातील सर्वात प्रभावशाली मुसलमानांमध्ये गणले जाते.
त्यांच्या रॉयल पॅलेसची किंमत 1 बिलियन डॉलर असून या पॅलेसमध्ये 100 हून अधिक रुम, बॉलरूम आणि 500 कारांसाठी पार्किंग आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या जहाजाचे मालकी हक्क असून, त्यांच्याकडे विमाने आणि लक्झरी कारांची मोठी संग्रह आहे. शेख तमीमच्या जीवनशैलीत ऐशोआराम आणि शाही ठाट दिसून येतात.