Rajnath Singh : 'वेळ आली की भारत करून दाखवेल!' इराण-अमेरिका युद्धावर राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून 'थेट' इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Rajnath Singh statement Iran US war : पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील रक्तरंजित संघर्षाने आता एका अत्यंत संवेदनशील वळणावर प्रवेश केला आहे. या युद्धाच्या ज्वाळा शांत करण्यासाठी जगभरातील मोठे देश प्रयत्न करत असतानाच, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीच्या भूमीवरून एक असे विधान केले आहे, ज्याने जागतिक राजकारणात भारताच्या वाढत्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. “आम्ही प्रयत्न केले आहेत आणि कदाचित उद्या ती वेळ येईल जेव्हा भारत या संकटात यशस्वी मध्यस्थ म्हणून समोर येईल,” या सिंह यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजनाथ सिंह यांनी जर्मनीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, भारत या संघर्षाकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. मोदींनी दोन्ही नेत्यांना युद्ध थांबवून चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केले आहे. राजनाथ सिंह यांच्या मते, भारताचा दृष्टिकोन हा कोणत्याही एका बाजूला झुकलेला नसून तो पूर्णपणे ‘संतुलित’ आहे. यामुळेच भविष्यात जेव्हा दोन्ही देश खऱ्या अर्थाने तडजोडीच्या मनस्थितीत असतील, तेव्हा भारत ही कोंडी फोडण्यासाठी सर्वात विश्वासार्ह देश ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iceman Promo : ड्रेकचा ‘कूल’ स्टंट! भर उन्हात शहरात अवतरला हिमनग; बर्फ वितळताच आत मोठं सरप्राइज, पाहा VIDEO
८ एप्रिल रोजी झालेल्या प्राथमिक शस्त्रसंधीनंतर, ११ आणि १२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक पार पडली. अमेरिकेचे जे.डी. व्हान्स आणि इराणचे एम.बी. गालिबाफ यांच्यात तब्बल २१ तास चर्चा झाली. मात्र, एवढ्या प्रदीर्घ चर्चेनंतरही दोन्ही बाजू एका करारावर पोहोचू शकल्या नाहीत. या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने जे.डी. व्हान्स तातडीने वॉशिंग्टनला रवाना झाले. जरी ही पहिली फेरी अयशस्वी ठरली असली, तरी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या देशांनी लावलेला जोर यामुळे किमान चर्चेचे दरवाजे तरी उघडले आहेत.
चर्चेची दुसरी फेरी स्थगित झाल्यानंतर एक मोठी घडामोड घडली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या आग्रहाखातर डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणला एका ठोस आणि व्यवहार्य प्रस्तावासह चर्चेला बसवण्यासाठी ते ही संधी देत आहेत. मुनीर यांनी तेहरानला दिलेली भेट आणि त्यानंतर दोन्ही देशांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवणे, हे या संकटातील एक आशादायक पाऊल मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: युद्ध थांबलं नाही! ट्रम्प यांनी हात पुढे केला, पण इराणने होर्मुझमध्ये ‘ट्रिगर’ दाबला, UKMTO Shipवर अंधाधूंद गोळीबार
राजनाथ सिंह यांच्या विधानाचा मथितार्थ असा आहे की, भारत सध्या योग्य वेळेची वाट पाहत आहे. जेव्हा इतर देशांची मध्यस्थी मर्यादित ठरेल, तेव्हा भारत आपल्या राजनैतिक वजनाचा वापर करून हा संघर्ष कायमचा संपवण्यासाठी पुढाकार घेईल. “आम्ही ही शक्यता नाकारू शकत नाही की भारत उद्या यशस्वी होईल,” हे वाक्य जागतिक पटलावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचे निदर्शक आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष हे इस्लामाबादमधील पुढील हालचालींकडे आणि भारताच्या संभाव्य मध्यस्थीकडे लागले आहे.
Ans: भारताने मध्यस्थीचा प्रयत्न केला असून प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; कदाचित भविष्यात भारत ही भूमिका यशस्वीपणे बजावेल, असे संकेत त्यांनी दिले.
Ans: अमेरिकेचे जे.डी. व्हान्स आणि इराणचे एम.बी. गालिबाफ यांच्यात ११ आणि १२ एप्रिल रोजी २१ तास चर्चा झाली, जी निष्फळ ठरली.
Ans: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीवरून इराणला ठोस प्रस्तावासह चर्चेला येण्यासाठी ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवली.






