'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले 'जैश'चे बेस पुन्हा उभारतंय पाकिस्तान; दहशतवाद्यांना चक्क ISI ट्रेनिंग देत असल्याची माहिती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहीम राबवत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीओकेच्या पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय जे भारताने नष्ट केले होते. ते पुन्हा उभारले जात आहे. यासाठी ISI ने एक मोहीम सुरु केली आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Afghanistan Bus Accident: हृदयद्रावक! अफगाणिस्तानमध्ये बस उलटली, २५ जणांचा जागीच मृत्यू, २७ जखमी
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चे मोठे षड्यंत्र समोर आले आहे. ISI केवळ जैश-ए-मोहम्मदचे तळ पुन्हा उभारत आहे, तसेच त्यांना ट्रेनिंगही देत आहे. दहशतवाद्यांना हायटेक शस्त्रे दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय दहशवाद्यांना आधुनिक युद्धासाठी तयार करत आहे. पारंपारिक शस्त्रे सोडून सैन्याला क्वाडकॉप्टर्स आणि ड्रोनचे ट्रेनिकंग दिले जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या सर्व कार्यासाठी पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर स्वत: जैशच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार आहे. यासाठी ५०% निधी देखील खर्च करण्यात आला आहे. सध्या ड्रोन आणि क्वाडकॉप्टर्सच्या खरेदीची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतविरोधी कट
ISI च्या मदतीने दहशतवाद्यांना मशीन गन, रॉकेट लॉंचर आणि मोर्टाचे ट्रेनिंग देणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा भारतविरोधी मोठा कट रचला जात असल्याचे संकेत आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि जैशचे संबंध खोल असून यांना पाकिस्तानी लष्कराकडून मोठी मदत मिळत आहे. पाकिस्तानकडून जैशला ८०० ते ९०० दशलक्ष पाकिस्तान चलनांमध्ये निधी पुरवला जात होता. आता यामध्ये आधुनिक शस्त्रांचीही भर पडली आहे. यामुळे भारतासाठी मोठा गंभीर धोका निर्माम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा यामध्ये सहभाग आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरच जैशचे नेटवर्क पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ऑरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरची हार झाली होती, यामुळे सध्या तोही भारतावर मोठा हल्ला करु शकतो असे म्हटले जात आहे.
पाकिस्तान केवळ जैशचे नाही तर इतर दहशवादी संघटनांची देखील पुन्हा उभारणी करत आहे. यासाठी उघडपणे निधी गोळा करुन प्रशिक्षण शिबिरे आणि लॉंच पॅड पुन्हा बांधले जात आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर चिंता ठरत आहे.
भारताच्या शेजारील देशातून २७०० कैदी फरार, ७०० अजूनही बेपत्ता; प्रशासन हादरले