Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल केली चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War news in Marathi : कीव/पॅरिस: रशियाचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की सध्या फ्रान्सला युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले आहे. रशियासोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान झेलेन्स्की फ्रान्सला गेले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांना याची माहिती दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक होणार असून यावेळी युक्रेनच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे.
झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही युक्रेनसाठी दीर्घकालीन सुरक्षा हमींना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, यासाठी आमच्या युक्रेनियन दलांनाही पाठिंबा देत आहोत. यामध्ये सहभागाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.
भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…
पुतिन झेलेन्स्कींशी चर्चा करण्यास तयार
झेलेन्स्की अशा वेळी फ्रान्सला गेले आहेत, जेव्हा पुतिन यांनी शांतता चर्चेसाठी युक्रेनशी थेट संवादवर हमी दिली आहे. याच वेळी रशिया आपल्या अटींवर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला शांततेने आणि संतुलनाने चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहे, पण गरज पडल्यास मॉस्को युद्ध बळजबरीने संपवेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र कीवने मॉस्कोमध्ये बैठकीचे प्रस्तावाला युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नकार दिला आहे.
The Coalition of the Willing. Meeting is now underway.
We are giving real substance to long-term security guarantees for Ukraine and ensuring support for our Ukrainian Defense Forces already now.
I thank everyone for their engagement and support. pic.twitter.com/nVv5QMdCkT
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) September 4, 2025
यापूर्वी फ्रान्सने युक्रेनला सुरक्षेची हमी आधीच दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेन सुरक्षेसाठी फ्रान्सवर अवलंबून राहू शकतो असे म्हटले आहे. शिवाय इटली, जर्मनी, ब्रिटनने देखील यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. परंतु अमेरिकेच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचे या देशांनी म्हटले आहे. यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत त्यांनी युक्रेनच्या सुरक्षेसाठी शस्त्र पुरवण्याचे मान्य केले होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेच्या मध्यस्थीने आणि युरोपीय देशांच्या मदतीने रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आतापर्यंतचे अनेक प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मात्र यावेळी हे प्रयत्न सफल होताना दिसत आहे. याची पुष्टी स्वत:हा झेलेन्स्कींनी केली आहे. नुकतेच त्यांनी म्हटले आहे ती, रशिया युद्धबंदीसाठी जास्त इच्छुक असल्याचे दिसून येत आहे, मात्र अमेरिका संभाव्य करारावर मॉस्कोकडून दिशाभूल करु नये असे त्यांनी म्हटले आहे.