एस जयशंकर यांनी अबू धाबीमध्ये घेतली क्राउन प्रिन्सची भेट; 'या' मुद्यांवर करण्यात आली चर्चा (फोटो सौजन्य: एक्स/@DrSJaishankar)
नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या चीन दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान भारत आणि UAE मधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान एस. जयशंकर यांनी म्हटले की, युवराजांना भेटून आनंद झाला आणि अलिकडच्या भारत भेटीची आठवण त्यांनी करुन दिली.
बैठक अत्यंत महत्त्वाची
या भेटीदरम्यान भारत आणि UAE मधील मैत्रपूर्ण संबंध आणि सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशाच्या नेत्यांनी भर दिला. याशिवाय, द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यावरच नव्हे तर दोन्ही देशांच्या जनतेच्या समान हिताच्या गोष्टी लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. यासाठी कोणते नवीन करार करता येतील यावर मार्ग काढण्यात आला. दोन्ही देशांना नवीन उर्जा आणि दिशा देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Honoured to call on HH @MohamedBinZayed. Conveyed warm greetings of PM @narendramodi.
Discussed the continued progress in our Comprehensive Strategic Partnership. Value his guidance for its future growth.
🇮🇳 🇦🇪 pic.twitter.com/7nSdWY0Wk2
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 28, 2025
राजनैतिक सल्लागारांशी भेट
याशिवाय, एस. जयशंकर यांनी अबू धाबीमध्ये UAE अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गश यांच्याशीही चर्चा केली. या बैठकीत भारत आणि UAE मधील विशेष धोरणात्मक भागीदारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, एस. जयशंकर यांनी रायसिना मिडल ईस्ट कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रातही भाग घेतला. या दरम्यान त्यांनी भाषणही केले. या भाषणात त्यांनी UAE प्रदेशात भारताच्या वाढत्या राजनैतिक उपस्थितीचे आणि भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
भारत-UAE संबंध
भारत आणि UAE संबंध पहिल्यापासून चांगले होतेच, मात्र एस. जयशंकर यांच्या या भेटीने भारत-UAE संबंधांना नवी चालना देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या भेटीपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, याबैठकीमुळे दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याची संधी उपलब्ध होईल. भारत आणि UAEमध्ये केवळ ऐतिहासिक संबंध नाहीत तर सध्या व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही खोलवर भागीदारी आहे. या भेटीमुळे या सर्व क्षेत्रांमध्ये संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे.